Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातून हज यात्रेला जाणा-या १६३६ यात्रेकरुंना महापालिकेद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

मुंबई 20 Aug 2016 - मुंबईतील`हज हाऊसयेथे मुख्यालय असणा-या`हज कमिटी ऑफ इंडियाया संस्थेद्वारे हज यात्रेकरुंना यात्रेला जाण्यापूर्वी प्रशिक्षण देण्यात येत असतेयाअनुषंगाने महाराष्ट्रातून हज यात्रेला जाणा-या १६३६ यात्रेकरुंना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन चमूद्वारे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले आहेविशेष म्हणजे हज यात्रेला जाणा-या ८१८ महिलांना देखील आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देण्यात आले असून यात्रेकरु महिलांना पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे अशी माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी दिली


`हज कमिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अताऊर रहमान (I.R.S.) यांनी हज यात्रेच्या अनुषंगाने प्रशिक्षकांना द्यावयाच्या आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षणासाठी पुढाकार घेऊन बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना सहकार्यास्तव विनंती केली होतीत्यानुसार अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरेआयकुंदन यांच्या मार्गदर्शनानुसार आपत्कालिन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी हज यात्रेकरुंना द्यावयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आराखडा तयार केला होताया आराखड्यानुसार `हज कमिटी ऑफ इंडिया'चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी खालिद अरब यांच्या नियोजनात विविध स्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे

हज यात्रेकरुंसाठीच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व रायगड या चार जिल्ह्यातून हज यात्रेला जाणा-या १६३६ यात्रेकरुंसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या प्रशिक्षणादरम्यान हज यात्रेला जाणा-या ८१८ महिला व ८१८ पुरुष यांना आपत्कालीन व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील नियंत्रण कक्ष पर्यवेक्षक (प्रशिक्षण) श्री. राजेंद्र लोखंडे यांनी दिले.

या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान आपत्ती प्रसंग उद्भवल्यास काय करावे व काय करु नये, याबाबत हज यात्रेकरुंना संगणकीय सादरीकरणासह मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने संभाव्य आपत्तींचे प्रकार व त्याप्रकारानुसार काय काळजी घ्यावी,तसेच हज यात्रेदरम्यान यात्रेकरुंकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा परिणामकारक वापर करुन प्रथम आपली व नंतर इतरांची सुरक्षा कशी करावी, याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे हज यात्रेदरम्यान परिधान केल्या जाणा-या पांढ-या रंगाच्या विशेष पोषाखाचा सुयोग्य वापर आपत्ती प्रसंगी कसा करावा, याचेही प्रात्यक्षिक उपस्थित प्रशिक्षणार्थींकडून करवून घेण्यात आले.

अतिशय पवित्र मानल्या जाणा-या हज यात्रेला भारतातून दरवर्षी सुमारे १ लाख ७० हजार तर जगभरातून सुमारे ३० लाख पेक्षा अधिक यात्रेकरु जात असतात. सुमारे ४० दिवस चालणा-या या यात्रेसाठी भारतातून जाणा-या सर्व यात्रेकरुंचे व यात्रेसंबंधी विविध बाबींचे समन्वयन `हज कमिटी ऑफ इंडिया' द्वारे केले जात असते. तसेच सर्व हज यात्रेकरुंना यात्रेसंबंधी सुयोग्य प्रशिक्षण देण्याची कार्यवाही देखील `हज कमिटी ऑफ इंडिया' द्वारे केली जात असते, अशी माहिती हज कमिटी ऑफ इंडिया' चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी खालिद अरब यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom