Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपट करमुक्त - मुख्यमंत्री

बुद्धांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ चित्रपट महत्वाचा ठरेल
मुंबई, दि. 29 : विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचे विचार तसेचत्यांचे जीवनचरित्र सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यात ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ हा चित्रपट महत्वाची भूमिका निभावेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.येत्या 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात हिंदी भाषेत प्रदर्शित होत असलेला हा चित्रपट करमुक्त करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज या चित्रपटाच्या ट्रेलरचे पहिले प्रदर्शन तसेच चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यातआले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, चीनचे कौन्सुलेट जनरल चांग-शी-युआंग, श्रीलंकेच्या कौन्सुलेट जनरल सरोज सिरीसेना, आमदार मिलिंद माने, भाई गिरकर, अभिनेते गगन मलिक, अभिनेत्री आँचल सिंह, अंशू मलिक, चित्रपटाचे महाराष्ट्रातील प्रस्तुतकर्ते नितीन गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गौतम बुद्धांनी जगाला शांती, समता आणिसौहार्दाचा मार्ग दाखविला. जग संघर्षाने नव्हे तर समन्वयाने चालेल हे त्यांनी सांगितले.दु:खातून मुक्ती मिळवून सुखी जीवनाकडे जाण्याचा मार्ग त्यांनी दाखविला. बुद्धांचे विचार हेधर्ममात्र नाहीत, तर ती जीवन जगण्याची एक पद्धती आहे. त्यांचे हे विचार सर्वसामान्यलोकांपर्यंत पोहोचविण्यात ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ हा चित्रपट महत्वाचे कार्य करेल. याचित्रपटाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांचे जीवनचरित्र आणि त्यांचा जीवनसंघर्षसर्वसामान्य लोकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सामाजिक न्याय मंत्री बडोले म्हणाले की, साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले विचार आजच्या काळातही जशास तसे लागू आहेत. भगवान गौतम बुद्धांचा विचार जगाला पुढे घेऊन जाऊ शकतो. येत्या 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनी भगवान गौतम बुद्धांचे विचार दर्शविणारा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, ही आनंदाची बाब आहे. हा चित्रपट जगाला गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश देण्यात निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चित्रपटात गौतम बुद्धांची भूमिका साकारलेले अभिनेते गगन मलिक यांनीही यावेळीआपले विचार व्यक्त केले. मूळ सिंहली भाषेत असलेला हा चित्रपट श्रीलंकेत निर्मित झालाअसून येत्या 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom