Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

‘होलार समाजाच्या मागासलेल्या स्थितीचा अभ्यास’ या विषयावर ‘बार्टी’तर्फे चर्चासत्र

मुंबई, दि. 20 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यातर्फे ‘महाराष्ट्रातील होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच मागासलेल्या स्थितीचा अभ्यास’ या विषयावरील चर्चासत्र दादर येथील वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे दि. 27 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत आयोजिण्यात आले आहे.
जातीच्या दाखल्यावर जातीच्या चुकीच्या नोंदी झाल्या असल्याने होलार समाजासाठी अडचणी निर्माण होत असल्याने ‘बार्टी’च्या संशोधन विभागामार्फत सोलापूर, सांगली, बीड व परभणी अशा चार जिल्ह्यांत शास्त्रीय पध्दतीने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा पुढील टप्पा म्हणून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात महाराष्ट्राच्या होलार समाजाच्या विविध संघटनांचे कार्यकर्ते व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom