पोलीस कल्याण निधी सदस्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2016

पोलीस कल्याण निधी सदस्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन योजना

मुंबई, दि. 30 : पोलीस दलातील कनिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी व पोलीस कल्याण निधीचे सभासद असलेले लिपीक वर्गीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या पाल्यांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा वाढीस लागावी या हेतूने पोलीस कल्याण निधी सदस्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन योजना या कार्यालयाकडून सुरु करण्यात आलेली आहे.
भारतीय अभियांत्रिकी संस्था (IIT), देशांतर्गत कोणत्याही वैद्यकीय व दंत महाविद्यालयात जेथे अखिल भारतीय स्तरावरील किंवा महाराष्ट्र राज्याच्य सीईटी मार्फत प्रवेश देण्यात येतो, भारतीय प्रबंध संस्था (IIM), सर्व नॅशनल लॉ स्कूल्स, सर्व राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था (NIT) मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक पाल्यास घटक पोलीस कल्याण निधीतून 25 हजार अनुदान देण्यात येईल.

या शिक्षण संस्थासह बी. टेक/बी.ए.एम.एस./बी.एच.एम.एस./इतर मॅनेजमेंट कॉलेज बी.सी.ए./एम.सी.ए. अशा प्रकारचे व त्यासमकक्ष इतर महत्त्वाचे शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना शिक्षणासाठी पोलीस निरीक्षक ते पोलीस शिपाई दर्जाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तसेच पोलीस कल्याण निधीचे सभासद असलेल्या लिपीकवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना कर्ज स्वरुपात शिक्षणासाठी वार्षिक ट्युशन फी स्वरुपात भराव्या लागणाऱ्या फी एवढी रक्कम रु. 50,000/- च्या वार्षिक कमाल मर्यादेत 12 महिन्याच्या परतफेड करण्याच्या अटीवर घटक पोलीस कल्याण निधीतून देण्यात येईल. त्या कर्जाची परतफेड केल्यानंतर संबंधित पाल्याने त्या कोर्समध्ये 60 % पेक्षा जास्त गुण मिळविल्यास व पाल्यांना आवश्यकता भासल्यास पुन्हा रुपये 50,000/- शैक्षणिक कर्ज (त्याच अटीवर) देण्यात येईल. ज्या घटक प्रमुखाच्या घटक पोलीस कल्याण निधीमध्ये शिल्लक निधी अत्यंत कमी आहे, त्यांनी मागणी केल्यास त्यांनी सादर केलेली प्रकरणे तपासून मध्यवर्ती पोलीस कल्याण निधीतून अनुदान/अग्रीम देण्यात येईल.

Post Bottom Ad