Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित बैठकीस उपस्थित राहण्याचे महापालिकेतर्फे आवाहन

मुंबई / प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे, दिनांक ६ डिसेंबर, २०१६ रोजी त्यांना अभिवादन करण्याकरीता येणाऱया अनुयायांसाठी सर्व सेवा-सुविधा पुरविण्याचे नियोजन महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे.


त्या अनुषंगाने ज्या संस्थांना / व्यक्तिंना स्वेच्छेने चैत्यभूमी, शिवाजीपार्क येथे येणाऱया अनुयायांना भोजनदान करावयाचे असल्यास त्यांच्याकरीता एक नियोजन बैठक मंगळवार, दिनांक ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी सकाळी ११ वाजता जी/उत्तर विभाग सभागृह, हरिश्चंद्र येलवे मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – ४०० ०२८  येथे महानगरपालिकेकडून आयोजित करण्यात आलेली आहे. तरी भोजनदान करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तिंनी / संस्थांच्या पदाधिकाऱयांनी सदर बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom