Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पोलिसांसाठी दोन वर्षात 30 हजार सर्वसुविधायुक्त निवासस्थानाचे बांधकाम पूर्ण -- देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 31 : पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्वसुविधा असलेली निवासस्थाने असावी यासाठी मागील दोन वर्षात सर्वाधिक 30 हजार निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. नागपूर-नाशिकसह वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या पोलिसांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी पोलिस गृहनिर्माणासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
बजाजनगर येथील नवीन पोलिस ठाण्याचे उद्घाटन तसेच पोलिस कर्मचाऱ्यांसाठी गिट्टीखदान परिसरात 280 घरकुल बांधण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, कृष्णा खोपडे, गिरीष व्यास, डॉ.मिलिंद माने, विकास कुंभारे, विभागीय आयुक्त अनूप कुमार तसेच पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, सहपोलिस आयुक्त संतोष रस्तोगी, नासुप्रचे विश्वस्त भूषण सिंगणे, विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम, माजी महापौर मायाताई इवनाते आदी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलिसांसाठी अस्तित्वात असलेली निवासस्थाने ही इंग्रजांच्या काळात बांधलेले आहेत असे सांगुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र काम करतात. अशा परिस्थितीत सर्वसुविधा असलेले निवासस्थाने बांधण्याचा निर्णय घेतला असून बांधकामासह दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मुंबई येथील घाटकोपर येथे 8 हजार घरांची स्मार्ट टाऊनशिप तयार करण्यात आली असून त्याच धरतीवर राज्यात गृहबांधणीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरही हक्काचा निवारा असावा यासाठी अल्प किंमतीत मालकी हक्काचे घरे देण्याची योजना राज्यात सुरु करण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निवृत्त पोलिसांना मालकी हक्काचे घरे देण्यात येणार आहे. मुंबईत 10 हजार मालकी हक्काचे घरे देण्याची योजना असून त्याच धर्तीवर नागपुरातही ही योजना राबवून पोलिसांच्या जिवनात परिवर्तन आणण्यात येईल.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom