Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्यातील सर्व खाजगी सुरक्षा रक्षकांची मंडळात नोंदणी आवश्यक - कामगारमंत्री


मुंबई - राज्यातील खाजगी सुरक्षा रक्षकांची नोंदणी सुरक्षा रक्षक मंडळात होणे आवश्यक असून सर्व खाजगी सुरक्षारक्षकांनी सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करावी, असे आवाहन आज कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कामगार आयुक्त यशवंत केरुरे, सहआयुक्त(माथाडी) अनिल लाकसवार, कामगार उपसचिव वर्षा भरोसे, सदस्य शाहू शिंदे, व्यंकटगीर गिरी, सुरक्षा रक्षक मंडळाचे सदस्य संदीप घुगे, विशाल मोहिते आदि यावेळी उपस्थित होते.

निलंगेकर म्हणाले की,राज्यातील विविध सहकारी संस्थामध्ये सुरक्षा रक्षक आणि कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. या अंतर्गत विविध लाभ प्राप्त करुन देण्यासाठी पूर्वी कामगार सुरक्षा रक्षकांना या कायद्याअंर्तगत लाभ प्राप्त होत नव्हता सदर लाभ प्राप्त करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचवण्यासाठी हा कामगार कायदा आता सुरक्षा रक्षकांनाही लागू करण्यात येणार आहे. त्यामुळेच सुरक्षा रक्षकांची नोंदणी संस्थांच्या कार्यकक्षेत आणली जाणार आहे.

आता राज्यातील अनेक हजारो सुरक्षा रक्षक कायद्याच्या संरक्षणापासून व लाभापासून वंचित आहेत अशा सुरक्षा रक्षकांना संरक्षण देण्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्याबरोबरच त्यांचे बळकटीकरण करुन सुरक्षा रक्षकाची अंमलबजावणी यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही निलंगेकर पाटील यांनी सांगितले.

ज्या कारखान्यात व आस्थापनेत खाजगी संस्थेमार्फत सुरक्षा रक्षक नेमण्‍यात येत आहेत यांची नोंदणी करण्याकरिता लगतच्या दिवसात 60 दिवस व त्यापेक्षा जास्त दिवस काम केले आहे त्यांनी मंडळाकरिता नोंदणी अर्ज करावे जेणे करुन त्यांची नोंदणी होईल. अशी नोंदणी न करणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळांवर व आस्थापनेच्या मुख्य मालकावर कारवाई करण्यात येईल.

केंद्र शासन अधिनियम 2005 खाजगी सुरक्षा संस्थेच्या कायद्यातंर्गत सर्व सुरक्षा रक्षकांना खाजगी संस्थेची नोंदणी करणे आवश्यक आहे. असे न करणाऱ्या खाजगी सुरक्षा संस्थेविरुद्ध गृहविभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. लातुर, उस्मानाबाद, बीड या तीन जिल्हयातील सुरक्षा रक्षक महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम 1981 च्या तरतुदीनुसार या जिल्हयातील दुकाने आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक कायदा लागु करुन व त्यांच्या करिता सुरक्षा रक्षक मंडळ गठीत करुन त्याचे मुख्यालय लातूर येथे ठेवण्याचे देखील महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ रक्षक प्रयत्न करीत आहे, असेही निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom