Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

तीन वर्षात ५२० वेळा रूळ तुटण्याच्या घटना


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईकरांची लाईफलाईन असलेली रेल्वेसेवा दरदिवशी कोणत्या ना कोणत्या कारणाने विस्कळीत झालेली असते. ओव्हर हेड वायर तुटणे, रूळाला तडा जाणे, पेंटाग्राफमध्ये खराबी येणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे इत्यादी कारणाने मुंबईची लोकल सेवा विस्कळीत असते. मुंबईची लोकल सेवा नेहमीच विस्कळीत असल्याने समीर झवेरी यांनी रेल्वेकडून माहिती अधिकारात याबाबत माहिती मागविली होती. याबाबतची माहिती देताना २०१४ पासून ऑक्टोबर २०१७ या कालावधीत मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर तब्बल ५२० वेळा रूळ आणि वेल्डिंग तुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी मध्य रेल्वेवर रूळ आणि वेल्डिंग तुटण्याच्या ३५६ घटना घडल्याचे रेल्वेने कळविले आहे. रेल्वे प्रशासन दर रविवारी रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर यांच्या मेंटेनंससाठी मेगाब्लॉक घेत असते. या मेगाब्लॉक दरम्यान खराब रेल्वे रूळ बदल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येतो मात्र हा दावा उपलब्ध झालेल्या आकडेवारीमुळे फोल ठरत असल्याचे उघड झाले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom