एसी लोकलमधून फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी दया - अनिल गलगली - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 December 2017

एसी लोकलमधून फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी दया - अनिल गलगली

मुंबई | प्रतिनिधी - २५ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या एसी लोकलमधून फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना प्रवास करण्याची संधी द्यावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्याकडे केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री व राज्यमंत्री यांना एक पत्र लिहिले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेत फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात प्रचंड गर्दी असते. पश्चिम रेल्वेने एसी गाडी सुरू केली आहे. एसी गाडीमधून फर्स्ट क्लासच्या पासधारकांना प्रवास करण्याची परवानगी दिली तर एसी लोकल रिकामी जाणार नाही. पासधारकाच्या पासची मुदत संपल्यावर प्रवाशांची इच्छा असेल तर नवीन पासमध्ये अतिरिक्त शुल्क आकारून त्यांना एसी लोकल व फर्स्ट क्लासमधून प्रवास करण्याची परवानगी दयावी. अशी मागणी गलगली यांनी केली आहे. फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी दिल्यास एसी लोकल रिकामी चालवावी लागणार नाही. एसी लोकलची संख्या कमी असल्याने प्रवाशांना लोकलची प्रतीक्षा न करता इतर लोकलने प्रवास करता येणार आहे.

Post Bottom Ad