Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

डॉ. आंबेडकरांचे लंडनचे घर खरेदी ही शासनासाठी गौरवाची बाब - सामाजिक न्याय राज्यमंत्री

नागपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथे उच्च शिक्षण घेत असताना वास्तव्य केलेले घर राज्य शासनाने खरेदी करणे ही गैारवास्पद बाब असल्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले. 

ॲड. जयदेव गायकवाड यांनी नियम 93 अन्वये उपस्थित केलेल्या सुचनेवर कांबळे यांनी निवेदन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तव्यास असलेल्या घराच्या खरेदीपोटी झालेल्या खर्चामुळे अनुसूचित जाती उपयोजनेतील योजनांच्या खर्चावर कोणताही विपरित परिणाम झालेला नाही. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या घराच्या खरेदीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून खर्च करण्यात आला असून अनुसुचित जाती व नवबैाध्द घटकांसाठीच्या योजनांना निधी अपुरा पडलेला नाही वा पडणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच मागासवर्गीयांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या निधीत कोणतीही कपात यासाठी करण्यात आलेली नाही. लंडन स्कूल ऑफ इकॉनॅामिक्समध्ये प्रवेश मिळाल्यास दोन विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्याची राज्य शासनाची योजना असल्याचे कांबळे यांनी शेवटी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom