Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मेट्रोने बेस्टचे आर्थिक नुकसान भरून द्यावे - अनिल कोकीळ


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मेट्रोच्या कामात अडथळे निर्माण करणारे बेस्टचे दीडशेहून अधिक बस थांबे उखडण्यात आले आहेत. त्यामुळे या बस थांब्याद्वारे जाहिराती द्वारे मिळणाऱ्या २० कोटींच्या उत्पन्नावर बेस्टला पाणी सोडावे लागले आहे. सध्या बेस्ट आर्थिक संकटात आहे. अश्या परिस्थितीत जाहिरातींतून मिळणारे उत्पन्न खूप महत्त्वाचे आहे. मात्र मेट्रोकडून बसथांबे हलविल्याने बेस्टचे आर्थिक नुकसान झाले आहे. हे आर्थिक नुकसान मेट्रो प्रशासनाने भरून द्यावे अशी मागणी बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी स्थापत्य समितीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली. बेस्टच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीच्या बदल्यात बेस्ट उपक्रमाला मेट्रोकडून १ कोटी ९ लाख रुपये देण्यात आल्याचा खुलासा एम एम आर डी ए कडून करण्यात आला.

मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांसाठी बेस्टचे दीडशेहून अधिक बसथांबे काढण्यात आले आहेत. त्यामुळे या थांब्यावर जाहिराती प्रदर्शित करून त्यावाटे मिळणाऱ्या २० कोटींच्या उत्पन्नावर बेस्टला पाणी सोडावे लागले आहे. हे थांबे पूर्वकल्पना न देता काढण्यात आल्याचा आरोप बेस्ट अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केला. कुलाबा ते सीप्झ, दहिसर - मंडाले, डी. एन. नगर ते वांद्रे या पट्टय़ात मेट्रोची कामे सुरु आहेत. मेट्रोच्या कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या अनेक बसगाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले असल्याने या बदललेल्या मार्गामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट होत असून त्याचबरोबर इंधन खर्चातही वाढ झाली आहे. त्यातच बेस्टला जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरही मेट्रोकामांमुळे परिणाम झाला आहे. बसथांब्यांवर जाहिराती प्रदर्शित करून त्याद्वारे बेस्ट उपक्रमाला कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न मिळते. सध्या आर्थिक संकटातून चाललेल्या उपक्रमासाठी जाहिरातींतून मिळणारे उत्पन्न खूप महत्त्वाचे आहे. मात्र मेट्रोच्या कामांमुळे बेस्टच्या या उत्पन्नालाही फटका बसला आहे. मेट्रोच्या कामांसाठी बेस्टचे मार्ग बदलण्यात आल्यानंतर पूर्वीच्या ठिकाणी असलेले थांबे उखडण्यात आले आहेत. त्यामुळे या थांब्यांवर जाहिरातीच प्रदर्शित करता येत नाही. यामुळे उपक्रमाचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे कोकीळ यांनी म्हटले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom