Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेविकांना १० हजार रुपये मानधन द्या - सुनिल प्रभू


नागपूर / मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेविकांना देण्यात आलेल्या कामात वाढ झाली आहे. त्या करत असलेल्या कामाच्या बदल्यात त्यांना अल्प मानधन देण्यात येते. त्यांच्या कामाचे महत्व अमोल असल्याने त्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करून त्यांना १० हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार व मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी औचित्याचा मुद्द्याद्वारे विधान सभेत केली आहे.

’’बृहन्मुंबईमध्ये महानगरपालिकेतर्फे प्रत्येक विभागातील नागरीकांना आरोग्य सेविकांच्या माध्यमातून १९९१ पासून आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. पुर्वी यामध्ये १००० घरांचे सर्वेक्षण करण्याचे काम एका आरोग्य सेविकेला करावे लागत होते. परंतू लोकसंख्या वाढल्यामुळे आता त्याच आरोग्य सेविकेला ३००० घरांमध्ये संपर्क साधून सर्वेक्षणाचे काम करावे लागत असून नागरिकांना आरोग्य केंद्रांकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती घरोघरी संपर्कसाधून देणे, गरोदर स्त्री यांची नोंदणी करणे व ५ वर्षापर्यंच्या बालकांचे लसिकरण करणे, ’अ’ जीवनसत्व वाटप व जंतू नाशक कार्यक्रम, स्त्री-पुरुष नसबंदी, संसर्गजन्य आजाराचे रुग्ण शोधणे, पल्स पोलीओ सारखे कार्यक्रम राबविणे आणि आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करुन नागरीकांमध्ये आरोग्य विषयक जागृतता निर्माण करणे आदी सेवाभावी कामे मुंबई महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या ५०००/- रुपये इतक्या अल्प मानधनामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेविकांना कराव्या लागतात. परंतू या अल्प मानधन रक्कमेतून सध्या महागाईच्या काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आरोग्य सेविकांना आवाक्याबाहेरचे आहे व ते कढीणही आहे. त्यामुळे आरोग्य सेविकांवर असलेल्या कामाची जबाबदार विचारात घेता व ते करीत असलेल्या कामाचे महत्व अमोल असल्याने त्यांच्या मासिक ५०००/- रुपयाच्या मानधनात १० हजार रुपये अशी वाढ करावी अशी आरोग्य सेविकांची अनेक वर्षापासूनच्या मागणी आहे. या प्रस्तावास शासनाने व मुंबई महानगरपालिकेने मान्यता द्यावी तसेच त्याची अंमलबजावणी २०१८ पासून सुरु होणााऱ्या नव्या वर्षापासून करण्यात यावी, अशी मागणी सुनिल प्रभू यांनी केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom