Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मैदाने आणि उद्यानाच्या दुरावस्थेबाबत उपाययोजना करा - रईस शेख



मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेकडून उद्याने व मैदाने यांचे योग्य प्रकारे परिरक्षण होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास होतो. मैदाने व मैदानातील रस्ते व ट्रॅक नादुरुस्त असल्याने दुर्घटना होत असून त्यामध्ये नागरिकांचे नाहक बाली जात आहेत. याबाबत महापालिकेने उपाययोजना करावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे नगरसेवक व गटनेते रईस शेख यांनी पालिका सभागृहात केली. पालिकेच्या ६६ ब अन्वये मैदानातील दुरावस्थेकडे शेख यांनी सभागृहाचे लक्ष केंद्रित केले.

मुंबईमधील चर्चगेट येथील कूपरेज मैदानात नादुरुस्त ट्रॅकवरून घोडेस्वारी करताना जान्हवी शर्मा या ६ वर्षाच्या मुलीचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला. मुंबई महानगर पालिकेच्या नियमानुसार सार्वजनिक उपवने व उद्यान आणि मनोरंजनासाठी जागा उभारणे हे कर्तव्य आहे. परंतु उद्यान खात्याकडून मैदाने आणि उद्यानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. उद्यान खात्याकडून परिरक्षणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक उद्यानात व मैदानात अपघाताच्या दुर्घटना घडत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. उच्च न्यायालयाने २०१५ पासून उद्यानात घोडेस्वारीवर बंदी घातली असताना अनेक उद्यान आणि मैदानात बेकायदेशीर घोडेस्वारी सुरु असल्याचे शेख यांनी सांगितले. उद्यानामध्ये बसवायची बाके तुटलेली असतात, खेळावयाची साधने गांजलेली असतात. मुलानी अशी गांजलेली साधने हाताळण्याच्या दृष्टीने घोकादायक असतात. मैदानामध्येही समतल जागा नसल्याने मुलांना मैदानी खेळ खेळताना गैरसोय होत आहे. मैदान व उद्याने यांचे महापालिकेकडून योग्य परिरक्षण होत नसल्याने पालिकेने याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी शेख यांनी केली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom