रविवारीही अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2017

रविवारीही अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईचा कमला मिल परिसरातील वन अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. शुक्रवारी पबला लागलेल्या आगीत पार्टी करणाऱ्या १४ जणांचा मृत्यू झाल्यावर पालिकेने शनिवारी अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरु केली. पालिकेची कारवाई रविवारी सुट्टीच्या दिवशीही सुरूच होती.

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मुंबई महापालिकेने शहरभरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. शनिवारी कारवाई दरम्यान तपासणी करण्यात आलेल्या ६२४ ठिकाणांपैकी अनियमितता व अनधिकृत बांधकामे आढळून आलेल्या ३१४ ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली आहे. तर ७ उपहारगृहे सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ४१७ पेक्षा अधिक सिलिंडर देखील जप्त करण्यात आले आहेत.

रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही मुंबई महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरात सर्वत्र बेकायदा बांधकामाविरोधातील कारवाईला सकाळपासूनच सुरूवात केली. या कारवाई दरम्यान गोवंडीतील विकास बारमधील बेकायदा सामान जप्त कारणात आलं आहे. एम पूर्व विभागातील खाना खजाना हाॅटेलच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात आली असून हॉटेलमधील १५ सिलिंडरही जप्त करण्यात आले. गोरेगाव पूर्वेतील पी दक्षिण विभागातील लकी हाॅटेलच्या खुल्या जागेवर उभारण्यात आलेल्या किचनवर कारवाई करण्यात आली. धारावीत हुक्का पार्लरमधून मोठ्या प्रमाणावर हुक्का जप्त करण्यात आला आहे. महालक्ष्मी मंदिराजवळील कॅफे फुमो या रूफ टॉप हॉटेलवरील छतही पालिकेने तोडून टाकले आहे.

तर के/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली अंधेरी पूर्वेकडील एम्पेरीअल हाॅटेलच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात आली. अंधेरी पश्चिमेकडील सरदार वल्लभभाई नगर येथील बाॅम्बे ठेका हाॅटेलवरही कारवाई करण्यात आली. कुर्ला एल वॉर्डमधील हाॅटेल हाॅलिडे इनचे बेकायदा बांधकाम तोडण्यात आले आहे. अग्निशमन सुरक्षा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी स्पाईस रेस्टाॅरंटला सील ठोकण्यात आलं. तर वांद्र्यातील एमआयजी क्लबसमोरील अमेया हाॅटेल आणि मालाडमधील मंत्रा हाॅटेलवर कारवाई करण्यात आली.

कमला मिलमधील पबना लागलेल्या आगीनंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनीअनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरु केले आहे. त्यासाठी आयुक्तांनी सर्वच वॉर्डातील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या असून सर्वांवर अनधिकृत बांधकाम तोडण्याचे काम सोपवण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, आय. ए. कुंदन आणि आबासाहेब जऱ्हाड हे सुद्धा रविवार असूनही कारवाईच्या ठिकाणी हजर होते.

Post Bottom Ad