बेस्ट २२५ मिनी व मिडी बसेस भाडेतत्वावर घेणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2017

बेस्ट २२५ मिनी व मिडी बसेस भाडेतत्वावर घेणार


भाड्यासाठी ७ वर्षांत ३०५ कोटीचा खर्च -
मुंबई । अजेयकुमार जाधव - 
बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने खर्च कमी करण्याचा प्रयत्न उपक्रमाकडून करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्ट उपक्रमाने २२५ बसगाड्या ७ वर्षांच्या कालावधीकरिता भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव बेस्ट समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. बेस्ट उपक्रमात पहिल्यांदाच बस भाडेतत्वावर घेतल्या जाणार असल्याने याचा अभ्यास करण्यासाठी दोन निविदाकारांकडून बसगाड्या घेतल्या जाणार आहेत.

बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने बस ताफ्यामध्ये कमालीची घाट झाली आहे. बेस्टकडे नव्या बसगाड्या खरेदीस पैसे नसल्याने नव्याने बस खरेदी करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे बेस्टच्या सेवेवर परिणाम झाला आहे. बसची संख्या कमी झाल्याने बस वेळेवर येत नसल्याने प्रवासी बसची वाट ना बघता खाजगी गाड्यांकडे वसला असल्याने बेस्टच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहेत. यामुळे प्रवाशांना उत्कृष्ट दर्जाची सेवा देण्यासाठी, प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी, देखभालीत सुधारणा, बसताफ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच भांडवली खर्च कमी करण्यासाठी २२५ मिनी आणि मिडी बसेस भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. बसगाड्या भाड्यावर घेतल्याने प्रवर्तनावर होणारा खर्च कमी होईल असा विश्वास बेस्टला आहे.

बेस्ट उपक्रम भाडेतत्वावर घेत असलेल्या २२५ बसगाड्यांपैकी १०० मिनी वातानुकूलित, १०० मिनी बिगर वातानुकूलित आणि २५ मिडी बिगर वातानुकूलित बसगाड्या भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. बसगाड्या भाडेतत्वावर पुरवण्यासाठी बेस्टने निविदा मागवल्या होत्या. यात प्रसन्ना पर्पल मोबिलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, श्री कृपा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, अँटोनी गॅरेजेस प्रायव्हेट लिमिटेड या तीन निविदाकारांनी भाग घेतला. अँटोनी गॅरेजेस व श्री कृपा सर्व्हिसेस यांनी दिलेला दर मिळताजुळता असल्याने दोन वेगवेगळ्या पॅकेजसाठी या दोन्ही निविदाकारांकडून बसगाड्या भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी बेस्ट उपक्रम सात वर्षांसाठी ३०५ कोटी ९५ लाख ५० हजार रुपये खर्च करणार आहे.

७ वर्षेसाठी केला जाणार खर्च -
बसगाड्यांचा प्रकार                   खर्च 
१०० मिनी एसी               १४४ कोटी १८ लाख १८ हजार रुपये
१०० मिनी नॉन एसी        १२३ कोटी १५ लाख २४ हजार रुपये
२५ मिडी नॉन एसी           ३८ कोटी ६२ लाख ८ हजार रुपये
एकूण                           ३०५ कोटी ९५ लाख ५० हजार रुपये

Post Bottom Ad