बेस्ट महाव्यवस्थापकांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यास बेस्ट समितीचा विरोध - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 December 2017

बेस्ट महाव्यवस्थापकांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यास बेस्ट समितीचा विरोध


मुंबई । प्रतिनिधी - राज्य मार्ग परिवहन महामंडळ विकास निधीयोजने अंतर्गत वाहतुकी संदर्भात बेस्टच्या महाव्यस्थापकांना ऑस्ट्रेलियाला अभ्यास दौऱ्याला जाण्यास समिती सदस्यांकडून विरोध करण्यात आला. बेस्ट आर्थिक तोट्यात असताना पालिका आयुक्त सुधारणा करण्यास सांगत आहेत. कर्मचारी अधिकाऱ्यांचे भत्ते गोठले गेले आहेत असे असताना महाव्यवस्थापकांनी परदेश दौऱ्यावर जाणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित करत महाव्यस्थापकांना दौऱ्यावर जाण्यास विरोध करण्यात आला. यावेळी दरवेळी महाव्यवस्थापकांनी अभ्यास दौऱ्यावर जाण्याऐवजी उपक्रमातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवावे अशी मागणी सदस्यांनी केली.

राज्य मार्ग परिवहन महामंडळ ह्यांनी हा दौरा आयोजित केलेला असून ऑस्ट्रेलिया व आजूबाजूच्या शहरात हा अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे. अत्यंत प्रगत सार्वजनिक परिवहन पद्धती जाणून घेण्याकरिता, तसेच नजीकच्या काळात परिवहन क्षेत्रामध्ये अलीकडे झालेल्या विकासाबाबत या अभ्यासदौऱ्यातून जाणून घेता येणार आहे. तसेच आय टी एस एप्लिकेशन, कार्यक्षम व्यवस्थापन जाणून घेणे, व त्याची अंमलबजावणी करण्याकरिता हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. येत्या १४ ते २० जानेवारी दरम्यान हा दौरा आयोजित करण्यात आला असून ऑस्ट्रेलियातील सिडनी मधील न्यू साऊथ वेल्स मध्ये तंत्रज्ञानाचा अभ्यास शिबिर आयोजित केले आहे. तसेच ऑस्ट्रेलियातील सर्वात प्रसिद्ध शहर ब्रिस्बेन मधील बस आगाराची भेट देऊन तेथील बसगाड्यांची दुरुस्ती, आधुनिक तिकीट प्रणाली अभ्यासायला मिळणार आहे. या सबंध दौऱ्याचा खर्च हा राज्य मार्ग परिवहन उपक्रम महामंडळाकडून केला जाणार असून याचा कोणताही खर्च बेस्ट उपक्रमावर पडणार नाही. या दौऱ्याला महाव्यवस्थापकांना विरोध करताना येत्या ६ जानेवारीला बेस्ट अर्थसंकल्पाचे सादरीकरण आहे , तसेच १५ जानेवारी पासून पालिका सभागृहात बेस्ट अर्थसंकल्पावर चर्चा सुरु होऊन २१ तारखेस अर्थसंकल्प मंजूर होण्याची शक्यता आहे . याचा विचार करता या महत्वाच्या कालावधीत महाव्यवस्थापकांना स्वतः उपस्तिथ राहणे आवश्यक आहे . तसेच पालिका आयुक्तांनी बेस्टच्या सुधारणांसाठी काही सूचना केल्या आहेत त्या अनुषंगाने महाव्यवस्थापकांनी दौऱ्यावर जाणे योग्य नसल्याचे विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी सांगितले. यावेळी बोलताना शिवसेना सदस्य राजेश कुसळे यांनी अशा अभ्यास दौऱ्यांचा अहवाल कधी सादर केला जात नसल्याचे निदर्शनास आणून अशा दौऱ्याचा बेस्ट उपक्रमास काहीच फायदा होत नसल्याचे सांगितले. बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी आयुक्तांनी सांगितलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महाव्यवस्थापकांवर असून त्याचबरोबर बेस्ट अर्थसंकल्पाच्यावेळीही त्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे, त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून महाव्यवस्थापकांनी वाहतूक विभागातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यास या अभ्यास दौऱ्यासाठी पाठवावे असे निर्देश कोकीळ यांनी दिले .

Post Bottom Ad