Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

बेस्टमधील पदोन्नती घोटाळ्याकडे दुर्लक्ष



मुंबई । अजेयकुमार जाधव -
बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत असताना अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुंबईचे महापौर आणि राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पत्र देऊन केली तरीही याबाबत पुढे कोणतीही कारवाई होत नसल्याची खंत बेस्ट उपक्रमाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक व बेस्ट जागृत कामगार संघटनेचे सरचिटणीस सुहास नलावडे यांनी व्यक्त केली आहे. बेस्ट या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी नलावडे यांनी केली आहे.

बेस्टमध्ये वरिष्ठ कर्मचारीय व्यवस्थापक (औद्योगिक संबंध) या पदावर कादरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पदांचा कार्यभार सांभाळण्यासाठी आवश्यक असलेली कायद्याची पदवी हि शैक्षणिक पात्रता नसल्याने त्यांची या पदावरून बदली करून सदर पद करण्याचा प्रस्ताव बेस्ट समिती व मुंबई महानगर पालिकेकडे पाठवावा. हे पद नव्याने भरण्यात यावे म्हणून म्हणून सुहास नलावडे यांनी बेस्टचे महाव्यवस्थापकांना जुलै महिन्यात पत्र दिले होते. या पत्रावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे नलावडे यांनी सांगितले. तसेच बेस्टमध्ये सन २०१४ - १५ मध्ये अधिकाऱ्यांना ऑफिस ग्रेड साठी पदोन्नती देण्यात आली होती. हि पदोन्नती मिळावी म्हणून १५८ उमेदवारांची यादी बनवण्यात आली होती. यादी बनवताना आम्ही पेपर तपासले आहेत पुन्हा पेपर तपासले जाणार नाहीत असे सांगण्यात आले होते. नंतर मात्र या उमेदवारांच्या पेपरची पुन्हा तपासणी करण्यात आली. पेपर तपासणीच्या वेळी मुंबई विद्यापीठाच्या नियमावलीचा वापर केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र असे न होता काही उमेदवारांना १८ मार्क्स वाढवण्यात आले आहेत. या पदोन्नतीची प्रतीक्षा यादी तब्बल तीन वेळा वाढवण्यात आली. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम हा पालिकेच्या परवानगीने बदलावा लागतो मात्र असे न होता बेस्टच्या पर्सनल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी आपली मनमानी करत अभ्यासक्रम बदलला असल्याचा आरोप होत आहे. सदर पदोन्नति देताना आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा संशय असल्याने या पदोन्नतीचीही चौकशी करण्याची मागणी नलावडे यांनी केली आहे. दरम्यान पर्सनल डिपार्टमेंटमध्ये काही अधिकारी वर्षानुवर्षे आपल्या पदाला चिकटून आहेत. इतर विभागातील अधिकाऱ्यांची नियमानुसार बदली केली जात असताना पर्सनल डिपार्टमेंटमधील अधिकाऱ्यांना मात्र हा नियम का लागू नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom