बेस्ट आणि डंपरची धडक, १५ जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2017

बेस्ट आणि डंपरची धडक, १५ जखमी


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईतील अंधेरी मरोळ येथे बेस्ट बस आणि डंपरच्या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. यात १३ प्रवासी, कंडक्टर व ड्रायव्हर यांचा समावेश आहे. हा अपघात रविवारी दुपारी घडला. या अपघातातील जखमींना उपचारासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जोगेश्वरीच्या येथील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार बेस्ट उपक्रमाची मरोळ डेपोतील बस मार्ग क्रमांक ५४५ ऐरोलीहून अंधेरीच्या आगरकर चौकाच्या दिशेने जात होती. दुपारी १२. ४५ च्या दरम्यान मरोळ येथील साठे चौकातील एका वळणावर डंपर उभा होता. त्यावेळी बेस्ट चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बेस्टने डंपरला धडक दिली. या अपघातात १५ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोणीही प्रवासी गंभीर जखमी झाला नसून सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या अपघाताची वस्तूस्थिती पडताळून दोषी चालकावर गुन्हा नोंदवणार असल्याचं एमआयडीसी पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान मरोळ बेस्ट डेपोच्या जवळ एका गल्लीमधून डंपर आल्याने बसने डंपरला धडक दिल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.

Post Bottom Ad