पब्सच्या परवानगीमागे नागपूरच्या आमदारांचा हात - संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2017

पब्सच्या परवानगीमागे नागपूरच्या आमदारांचा हात - संजय निरुपम

मुंबई | प्रतिनिधी - कमला मिल परिसरात ९६ पेक्षा जास्त रेस्टॉरंट्स आणि पब आहेत. रेस्टॉरंट्स आणि पब पैकी बहुतेक अनधिकृतपणे बांधण्यात आलेली आहेत आणि राजरोसपणे सुरु आहेत. ३ महिन्यांपूर्वी या संबंधित आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले होते, पण त्याचे कोणतेही उत्तर मिळाले नाही. याला जबाबदार कोण ? एवढ्या छोट्या कंपाउंडमध्ये एवढी रेस्टॉरंट्स कशी काय सुरु आहेत ? त्यांना परवानगी कशी मिळाली ? याचे उत्तर पालिकेचे आयुक्त आणि अधिकारीच देऊ शकतात. मुंबई महापालिका अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या दबावाशिवाय हे होऊ शकत नाही. अलीकडच्या काळात शिवसेनेचे युवा नेते सुद्धा तिकडे येऊन गेले होते. पबच्या मालकाशी त्यांचे काही साटेलोटे आहे का? याचीही चौकशी व्हायला हवी. तसेच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या पब्सना परवानगी मिळण्यामागे भाजपच्या नागपूरच्या आमदारांचा हात आहे, ज्याने या पब्सना परवानगी देण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकला. त्या आमदाराची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन किंवा सीबीआय चौकशीच झाली पाहिजे, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.

Post Bottom Ad