Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चेंबुरमधील ‘त्‍या’ पीडित मुलाला पालिकेची नोकरी देण्याचा निर्णय घेऊ - महापौर


आमदार नागरसेवकांकडूनही मदत -
मुंबई । प्रतिनिधी - चेंबूर येथे बसची वाट पाहत बसलेल्या शारदा घोडेस्वार या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना महानगरपालिकेद्वारे बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे मिळणारी एक लाख रुपयांची मदत तुंटपुंजी आहे. यामुळे शारदा घोडेस्वार यांच्या मोठया मुलाला महापालिकेच्‍या सेवेत सामावून घेण्‍याची मागणी स्‍थानिक नागरिकांनी महापौरांकडे केली. यामागणीबाबत गटनेत्‍यांच्‍या बैठकीत सर्वपक्षीय नेत्‍यांसोबत चर्चा करुन योग्‍य तो निर्णय घेणार असल्‍याचे महापौरांनी आश्वासन दिले आहे.

चेंबूर येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ यांच्यावर झाड पडून त्यांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण गाजत असतानाच चेंबूर विभागात बस थांब्यावर बसची वाट पाहणाऱ्या शारदा घोडेस्वार यांच्यावर झाड पडून जागीच मृत्यू झाला आहे. घोडेस्वार या एकट्या कमावत्या होत्या, त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी होती, त्यांच्या मुलांची शिक्षण चालू आहेत, शारदा यांचा मृत्यू झाल्यावर व्याजाने पैसे घेऊन त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. पालिकेच्या दुर्लक्षामुळे आणि चुकीमुळे असे प्रकार होत असल्याने अश्या प्रकरणात पालिकेने संबंधितांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.

अश्या परिस्थिती शारदा घोडेस्‍वार यांच्‍या चेंबुर येथील घरी मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी भेट देऊन त्‍यांच्‍या मुलांचे सांत्‍वन केले तसेच त्‍यांना वैयक्तिकरित्‍या आर्थ‍िक मदत केली. यावेळी स्‍थानिक आमदार तुकाराम काते, सुधार समिती अध्‍यक्ष अनंत नर, स्‍थानिक नगरसेविका समृध्‍दी काते, एम /पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्‍त हर्षद काळे उपस्थ‍ित होते. यावेळी धोकादायक झाडांबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केल्‍यास तातडीने संबधित अधिकाऱयांनी त्‍याठिकाणी जाऊन पाहणी करावी व तात्‍काळ योग्‍य तो निर्णय घ्‍यावा, अशी सूचनाही महापौरांनी संबंधित अधिकाऱयांना केली.

आमदार नागरसेवकांकडूनही मदत -
शारदा घोडेस्वार यांच्या अंगावर झाड पडून दुर्दैवी मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युमुळे वृद्ध माता आणि शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांचा आधार हरपला. घरची परिस्थिती हलाकीची असल्याने अंत्यविधीचा खर्च 65 वर्षीय वृद्ध महिला व घरातील 12, 16 आणि 17 वर्षाच्या 3 मुलांवर पडला होता. अंत्यविधीसाठी 10 टक्के दराने 15 हजाराचे कर्ज घेऊन त्यांचा अंत्यविधी केला. हि अत्यंत मन हेलावणारी दुर्दैवी घटना कळताच आमदार सुनिल शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी चेंबूर येथील त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व आर्थिक मदतीचा धनादेश दिला. या मुलांच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी घेतली. स्थानिक आमदार तुकाराम काते यांनी या महिलेच्या कुटुंबियांना शासनाच्या योजनेतून आर्थिक मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. तर नगरसेविका किशोरी पेडणेकर महापालिकेत याबाबत मुद्दा उपस्तित करून महापालिकेच्या माध्यमातून घोडेस्वार कुटुंबियांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom