मुंबईतील वाढत्या आगींच्या घटनांचे अग्निशमन दलासमोर आव्हान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 December 2017

मुंबईतील वाढत्या आगींच्या घटनांचे अग्निशमन दलासमोर आव्हान


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत आगी लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून महिन्याला छोट्या - मोठ्या सुमारे 10 ते 15 घटना घडतात. मागील वर्षभर आगी लागण्याचे प्रमाण मोठे आहे. वर्ष संपता संपता साकीनाक्याची दुर्घटना मुंबईला हादरवून गेली. प्रत्येक महिन्याला आगीची घटना घडते. अगदी छोट्या - मोठ्या आगी धरल्या तरी महिन्याला 10 ते 15 घटना घडल्याची नोंद झाली आहे. मुंबईत वाढणारी लोकसंख्या व त्याच प्रमाणात दाटीवाटीने वाढणा-य़ा झोपड्या, व्यवसाय, उंच टोलेजंग इमारती त्यात नियम धाब्यावर बसवून उभारण्यात यंणारी यंत्रणा, बांधकाम, ज्लालाग्राही पदार्थ, वीज जोडणी, गॅस सिलेंडर आदींमुळे आगींचे प्रमाण वाढले आहे. चिंचोळ्या वसाहतीमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवणे अग्निशमन दलाला कठीण जाते. मागील वर्षभरात आगीचे सत्र सुरू आहे. यांत शॅार्ट सर्किटमुळे आ्गी लागण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे या आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले आहे.

वर्षभरात लागलेल्या काही मोठ्या आगीवर लक्ष टाकल्यास जानेवारी महिन्यात कुर्ला पश्चिम येथील सीएसटी रस्त्यावरील कपाडीया नगरच्या रद्दी सामानाने लागलेल्या 20 -25 गोदामाना गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली. ही आग विझवताना दलाचे दोन जवान जखमी झाले. तसेच सीएसटी - मशिद स्थानका जवळील झोपड पट्टीला भीषण आग लागली. या आगीमुळे काही वेळ रेल्वे गाड्याही थांबवण्यात आल्या. या आगीत सहा ते सात मुले जखमी झाली होती. मार्च महिन्यात गिरगावातल्या काकडवाडीत आग लागली. येथे तळमजल्य़ातील लॉंड्रीतल्या कपड्यांनी पेट घेतला (सकाळी) ही आग पहिल्या मजल्यापर्यंत गेली व त्यात एका कुटुंबातील दोघं जखमी झाली तर एकाचा मृत्यू झाला. मे महिन्यात नायर रुग्णालयातील ईएनटी विभागाच्या इमारतीला शॉर्टसर्किटमुळे भर दुपारी मोठी आग लागली. ती विझवायला तीन तासाहून अधिक वेळ लागला. या आगीत विद्युत यंत्रणांचे नुकसान झाले होते.

सप्टेंबर महिन्यात चेंबुरच्या आर के स्टुडीओत दोन सेट जळून खाक झाले. येथे आग विझवणारी अग्निशमन यंत्रणा काम करीत नव्हती. यावेळी चित्रीकरण नसल्याने मोठी दुर्घटना टऴली. तसेच विलेपार्ले येथील सागर ज्योती इमारतीत आग लागली. या आगीत काहीजण जखमी झाले. ऑक्टोबर महिन्यात जवाहरव्दीप व बुचर बेटावरच्या बीपीसीएल टाकीवर वीज पडून मोठी आग लागली. 30 हजार मेट्रिक टनाच्या टाकीत हायस्पीड डिझेल ठेवलेले होत, ते जळलं. बाकीच्या टाकी सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली. 12 ज्वालाग्राही टाक्यांमध्ये पेट्रोलियम डिझेल द्रव्यांचा साठा ठेवला होता. आग लागलेली टाकी वितळून खाक झाली. वांद्रे पूर्व येथील गरीब नगर - बेहराम पाडा झोपडपट्टीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. यांत तीघे जखमी झाले आहेत. या आगीच्या घटनेचा विपरीत परिणाम रस्ते व हार्बर मार्गावरील रेल्वेसेवेवर झाला. यावेळी हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, रोद्ररुप धारण केलेल्या अागीवर तब्बल साडेचार तासांनी अग्निशमन दलाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तसेच विलेपार्ले येथे दोन महिन्यांपूर्वी विलेपार्ले येथील सागर ज्योती या इमारतीत भीषण आग लागली. ही आग विझवताना एक जवान जखमी झाला होता.

तर डिसेंबर महिन्यात वर्ष संपता संपता साकीनाका खैरानी रोडवरील भानू फरसाण दुकानाला लागलेल्या भीषण आगीत आज १२ कामगार होरपळून ठार झाले. भल्या पहाटे सवाचारच्या सुमारास अचानक आगीचा भडका उडाल्याने झोपेत असणार्‍या कामगारांना जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत वाचलेला एक कामगार जखमी झाला आहे. आग इतकी भयंकर होती की मोठ्या प्रमाणावर होरपळल्याने त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले होते.

Post Bottom Ad