Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

रुफटॉप हॉटेलची पॉलिसी रद्द केली जाणार ?

पालिका सभागृहात रुफटॉप विरोधात खडाजंगीची शक्यता  -
मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल परिसरातील इमारतीच्या टेरेसवर असलेल्या दोन पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. या १४ जणांच्या मृत्यूनंतर पालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारात मंजूर केलेली रुफटॉप (गच्चीवरील उपाहारगृह) हॉटेलची पॉलिसी रद्द केली जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांसह भाजपनेही रुफटॉप हॉटेलच्या निर्णयाला कडाडून विरोध सुरू केला असून येत्या पालिका सभागृहात यावर जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. 
       
गच्चीवरील उपाहार गृह(रुफ टॉप) युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या पुढाकारातून  संकल्पना पुढे आली. या प्रस्तावाला विरोधकांनी जोरदार विरोध केला होता. मात्र आयुक्तांच्या अधिकाराखाली हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार मुंबईतल्या व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल उभारण्याची परवानगी दिली गेली. मात्र कमला मिलमधल्या आगीच्या दुर्घटनेनंतर रुफ टॉपवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पालिकेने या दुर्घटनेनंतर केलेल्या सलग दोन दिवसांच्या कारवाईत नियम धाब्यावर बसवणार्या हॉटेल पब, रेस्टॉरंट वर बुलडोझर फिरवला. ही संख्या मोठी आहे. त्यामुळे रुप टॉप हॉटेल ना जोरदार विरोध सुरू झाला आहे. कमला मिलच्या दुर्घटनेनंतर रुफ टॉपचा निर्णय धोक्यात आला आहे. रुफ टॉप हॉटेलच्या प्रस्तावाची अधिकृत अंमलबजावणी होण्याआधीच अनधिकृतपणे कार्यरत असलेल्या रुफ टॉप हॉटेलचं भयानक वास्तव समोर आल आहे.

रुफटॉप हॉटेलपासून 10 मीटर अंतरावर कोणतीही निवासी इमारत नसावी, अशी अट घालण्यात आली होती. तसंच मॉल आणि लॉजिंग भागात रुफ टॉप हॉटेलला परवानगी होती. अशा काही बाबी धोरणात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.  विशेष म्हणजे हा प्रस्ताव मंजूर करताना शिवसेना वगळता भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीनेही या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. प्रचंड विरोध असतानाही शिवसेना आग्रही असलेल्या रुफटॉप हॉटेल प्रस्तावाला आयुक्तांनी परस्पर मान्यता दिली होती.रुफ टॉप हॉटेलच्या प्रस्तावाची अधिकृत अंमलबजावणी होण्याआधीच अनधिकृतरित्या कार्यरत असलेल्या रुफ टॉप हॉटेलांचे भयानक  चित्र समोर आले. कमला मिल कम्पाउंड मधील आग दुर्घटनेत 14 जणांचा बळी गेला. त्यामुळे नियम आणि अटी टाकूनही या प्रस्तावाची चांगली अंमलबजावणी होईल का? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रुफ टॉप हॉटेल याबाबतची नियमावलीची अमलबजावणी होईल काय? यावर पालिकेच्या काही अधिकऱयांचेच प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे रूप टॉप पालिकेतील अधिकाऱ्यांचीही डोकेदुखी बनणार असल्याने त्यांनाही हे नको आहे. त्यामुळे  वादग्रस्त ठरलेला रुफ टॉप हॉटेलचा प्रस्ताव आयुक्त मागे घेणार का? यावर  जोरदार चर्चा आहे. येत्या पालिका सभागृहात यावर गदारोळ होण्याची शक्यता आहे. 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom