Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

हेगडेंचा निषेध करत भाजप कार्यालयावर शाई फेकली


औरंगाबाद - केंद्रीय राज्यमंत्री भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधान बदलण्यासाठीच भाजप सत्तेत आल्याचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या (खरात) दोन महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उस्मानपुरा येथील शहर कार्यालयावर शाई फेकली. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. वेदांतनगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अनिल आढे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर शेंगडे यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. दुपारी दीडच्या सुमारास दोन महिला आल्या. त्यांनी घोषणा दिल्या शाई फेकल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती आढे यांनी दिली. शाई फेकणाऱ्या एका महिलेचे नाव कांताबाई असल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom