सलमान खान विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवा - खेमचंद सोलंकी - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2017

सलमान खान विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवा - खेमचंद सोलंकी


मुंबई । प्रतिनिधी - सुप्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान याने आपल्या डान्स बद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. सलमानच्या या वादग्रस्त वक्तव्याने मागासवर्गीय असलेल्या भंगी समाजाने आक्षेप घेतला असून सलमानवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती खेमचंद सोलंकी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सोलंकी बोलत होते.

सलमान खान यांनी एका कार्यक्रमात आपला डान्स भंगी असल्याचे विधान केले होते. सलमानने हे विधान करताना भंगी शब्दाचा उच्चार जाहीररित्या केला आहे. सलमान खान यांनी असे विधान केल्याची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे. सलमान यांना असंविधानिक शब्दाचा वापर केला असल्याने मुख्यमंत्री, गृह विभाग, सहाय्यक पोलीस आयुक्त, बांद्रा यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. सलमान खान यांनी हे वक्तव्य केले आहे का याची चौकशी करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली असल्याची माहिती खेमचंद सोलंकी यांनी दिली. सलमान खान यांच्याकडून चुकून असे वक्तव्य झाले असल्यास त्यांनी समाजाची माफी मागावी असे आवाहन सोलंकी यांनी यावेळी केले. दरम्यान सलमान खान यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली. यावेळी सलमानवर कारवाईचे निवेदन मुख्यमंत्र्यांना व पोलीस विभागाला देण्यात आले.

Post Bottom Ad