इच्छामरण मागणाऱ्या रुग्णाला यूएसएसएच हॉस्पिटलने दिले जीवनदान - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

16 December 2017

इच्छामरण मागणाऱ्या रुग्णाला यूएसएसएच हॉस्पिटलने दिले जीवनदान


मुंबई - मूत्रपिंडाच्या आजारामुळे गेले दोन वर्षे त्रस्त असलेली महिला अंथरुणाला खिळली होती. एका खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. हा उपचारांवर होणारा खर्च रुग्णाच्या कुटुंबालाही परवडेनासा झाल्याने त्या महिला रुग्णाने वेदनेला कंटाळून कुटुंबाकडे स्वेच्छामरणाची इच्छा बोलून दाखवली होती. या महिलेवर उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल (यूएसएसएच) मधील तज्ञ डॉक्टरांनी जीवदान दिले आहे.

संपदा पारकर या भांडूप येथे राहणाऱ्या महिला २०१० पासून मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्रस्त होत्या. गेल्या दोन वर्षांत या आजारामुळे त्यांची परिस्थिती आणखीच खालावली. प्रचंड वेदना, अन्नावरची वासना उडालेली असल्यामुळे पराकोटीचा अशक्तपणा आल्यामुळे या ३७ वर्षीय तरुण रुग्ण महिलेवर अंथरुणाला खिळण्याची वेळ आली. एका खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. हा उपचारांवर होणारा खर्च रुग्णाच्या कुटुंबालाही परवडेनासा झाला होता. त्यावेळी त्या रुग्णाने वेदनेला कंटाळून कुटुंबाकडे स्वेच्छामरणाचाही विचार बोलून दाखवला होता. परंतु, उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल (यूएसएसएच) मधील तज्ञ डॉक्टरांच्या मते, संपदा यांची तब्बेत केवळ डायलेसिस, फिजिओथेरपी आणि वेळोवेळी योग्य उपचार घेतल्यामुळेही सुधारू शकणार होती. काही महिन्यांपूर्वी संपूर्णतः अंथरुणावर खिळलेल्या संपदा आता मात्र आपली दैनंदिन दिनचर्या स्वतंत्रपणे पार पाडू शकतात. 

``फेब्रुवारी २०१७ मध्ये वजन प्रचंड वाढलेल्या अवस्थेत संपदा यांना यूएसएसएचमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात भरती करतेवेळी त्यांच्या पोटात असह्य वेदना होत होत्या, डोकेदुखी होती आणि अन्नावरील वासनाही उडालेली होती. अनेक तपासण्या केल्यानंतर आमच्या लक्षात आले की, आत्तापर्यंत योग्य उपचार न झाल्यामुळे त्यांची परिस्थिती फारच नाजूक व गंभीर बनली होती. त्यांची तब्बेत सुधारण्याकरीता, आठवड्यातून तीन वेळा हिमोडायलेसिस करावे लागेल, असा सल्ला आम्ही दिला. त्याचबरोबर, सुयोग्य व पुरेश्या प्रमाणात फिजिओथेरपी व आहार तज्ञाचे मार्गदर्शनही आम्ही घेतले. त्यानंतर, पुढच्या पंधराच दिवसांत त्यांच्या पायांमध्ये हालचाल झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या स्नायूंमधली ताकद वाढली आणि आधार घेऊन त्या स्वतः उभ्या राहू लागल्या,`` असे यूएसएसएचच्या न्यूरोलॉजीस्ट डॉ. धनश्री चोणकर म्हणाल्या.

आजारातून पूर्ण बऱ्या झालेल्या पारकर म्हणतात, ``मूत्रपिंड प्रत्यारोपणापासून मला वाचवणाऱ्या यूएसएसएचच्या सर्व तज्ञ डॉक्टरांची व टीमची मी कायम ऋणी राहेन. रुग्णालयातून रजा घेताना मी माझे मूलभूत दैनंदिन व्यवहार स्वतंत्रपणे करू शकत होते. मला कोणत्याही वेदना, नॉशिया किंवा अशक्तपणा वाटत नव्हता. आता काही वेळा मी स्वयंपाकही करते. काही वेळा अशक्तपणा जाणवतो, पण माझे स्वातंत्र्य आता मला परत मिळाले आहे.``

Post Top Ad

test
test