Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

झवेरी बाजार येथे स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू


मुंबई - झवेरी बाजारातील म्हाडाच्या सेस (उपकर प्राप्त) इमारत क्रमांक ५०/५२ चा काही भाग कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना झालेल्या दुर्घटनेत चार मजूरांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईचा झवेरी बाजार हा व्यावसायिक विभाग म्हणून नावाजलेला आहे. या ठिकाणी अनेक मोठी दुकाने, होलसेल मार्केट तसेच ज्वेलर्सची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे दिवसभर या विभागात लोकांची गर्दी असते. याठिकाणी ज्वेलर्सच्या दुकानात व कारखान्यात काम करणारे कारागीर राहतात. अश्या गजबजलेल्या विभागात म्हाडाची ‘५०/५२ सीपी’ हि पाच मजली इमारत आहे. या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच दुपारी दीडच्या सुमारास चाळीच्या मागचा स्लॅब अचानक कोसळला. दुर्घटना घडली, तेव्हा १५ मजूर घटनास्थळी कार्यरत होते. इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच, जीव वाचवत काही मजूर येथून पळाले. चौथ्या मजल्यावर एकूण दहा मजूर कार्यरत होते. त्यापैकी सात कामगार सुखरूप बाहेर पडले. तर पहिल्या मजल्यावर सहा कामगार कार्यरत होते. येथील पाच कामगार जीव मुठीत घेऊन पळाले. चार मजूर ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे काम शुक्रवारी दुपारपासून सुरु होते. ढिगारा उपसताना फिरोज वाब खान (२३), सफारूल्लाक (२२), रॉकी शेख (२२) आणि बरकत अली खान (५०) या चार मजूरांना अग्निशमन दलाने बाहेर काढले व जवळच्या रुग्णालयात पाठवले. त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom