Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

जानेवरीपासून टेक्स्टाईल म्युझियमच्या कामाला सुरुवात होणार


मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेने जुन्या मिलच्या जागेवर टेक्स्टाईल म्युझियम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल क्रमांक 2 व 3 येथे टेक्स्टाईल म्युझियम दोन टप्प्यात विकसित करण्यात येणार आहे. म्युझियमच्या पहिल्या टप्प्याच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत म्युझियमच्या कामाला सुरुवात होऊ शकते असा विश्वास पालिकेला आहे.

इंडिया युनाटेड मिल क्रमांक 2 व 3 च्या जागेवर 61 हजार 56 .89 चौरस मीटर क्षेत्रफळापैकी 44 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ मनोरंजन मैदान व टेक्स्टाईल म्युझियमसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 44 हजार क्षेत्रफळापैकी 20 टक्के क्षेत्राचा पहिल्या टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. मिलच्या आवारात सुमारे 2 हजार 368 चौरस मीटर तलाव आहे. या तलावातील पाणी मिलमध्ये पूर्वी वापरण्यात येत होते. सध्या हा तलाव वापरात नसल्यामुळे तो गाळाने भरून गेला आहे. पहिल्या टप्प्यात हा गाळ काढून तलाव विकसित करण्यात येणार आहे. तलावाच्या काठावर पर्यटकांना बसता यावे, यासाठी नदीकाठावरील घाटाप्रमाणे पायर्‍या बनवण्यात येणार आहेत. तलावात दोन प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. त्याशिवाय संरक्षक भिंत व तलाव परिसराला हेरिटेज लूक येण्यासाठी दगडी लादीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 6 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तलावाच्या वरील बाजूस मोठे उद्यान साकारण्यात येणार असून परिसरात खाद्यपदार्थांचे संकुल, शौचालय व अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या कामाच्या निविदा अंतिम टप्पात असून पुढील महिन्यात कामाची सुरुवात झाल्यास वर्षाच्या शेवटपर्यंत या टेक्सटाईल म्युझियमचे काम पूर्ण होऊन त्याचे उदघाटन करता येऊ शकते असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom