वडाळ्यात शौचालयाचा प्रथम स्मृतिदिन साजरा - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2017

वडाळ्यात शौचालयाचा प्रथम स्मृतिदिन साजरा


मुंबई । प्रतिनिधी - एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर तो व्यक्ती आपल्यामधून निघून गेल्याने त्याची आठवण म्हणून त्याचा स्मृतिदिन साजरा केला जातो. वडाळ्यात मात्र मनसे आणि स्थानिक नागरिकांनी एका शौचालयाचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, वडाळा येथील अंबिका वाडी येथील सागर बार शेजारील शौचालय २२ डिसेंबर २०१६ ला अचानक पडले होते. हे शौचालय पुन्हा बांधावे म्हणून म्हाडा, मुंबई महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिले नसल्याने गेले वर्षभर येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. शौचालय पडले असल्याने वृद्ध, महिला व लहान मुलांचे हाल सुरु आहेत. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव म्हाडा, मुंबई महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींना व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वडाळा विधानसभा विभाग अध्यक्ष आनंद प्रभु व अनंत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १८१ चे शाखा अध्यक्ष संजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली २२ डिसेंबरला एक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सदर शौचालयाचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिकही उपस्थित होते.

Post Bottom Ad