कमला मिल दुर्घटना - खुशबूचा वाढदिवासालाच मृत्यू - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2017

कमला मिल दुर्घटना - खुशबूचा वाढदिवासालाच मृत्यू


यशाचं मुंबई पाहण्याचे स्वप्न राहिले अधुरे -
मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल कंपाउंड मधील पबला लागलेल्या आगीमध्ये वाढदिवस साजरी करणारी खुशबू मेहता आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गुजरातहून मुंबईला आलेली यशा यांचाही मृत्यू झाला आहे. खुशबूच्या जाण्यानं मेहता कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खुशबू मेहता हिचा २८ वा वाढदिवस साजरा केला जात होता. खुशबू आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी पबमध्ये आली होती. तिच्या सोबत तिच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यावेळी हजर होते. खुशबू हिने वाढदिवसाचा केक कापल्यानंतर पबला आग लागली. आगीमध्ये खुशबूचाही मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी यशा गुजरातहून मुंबईला आली होती. थर्टी फर्स्ट डिसेंबरसाठी तिची तयारी होती. ती पहिल्यांदाच नव्या वर्षाचं स्वागत मुंबईत करणार होती. त्यामुळे ती फारच उत्साहात होती. मुंबई फिरण्याचं यशाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. यशा रात्री चुलत भाऊ आणि बहिणीसोबत कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजोज रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये जेवायला गेली होती. पण त्यानंतर तिथे आग लागली आणि पाहता पाहता आग हॉटेलमध्ये पसरली. आग लागल्यानंतर चुलत बहिण जीव वाचवण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्याने ती बचावली. पण यशा आगीच्या कचाट्यात सापडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यशाचे आई-वडील गुजरातहून मुंबईत दाखल झाले आहेत. याच पार्टीमध्ये कविता आणि तेजल सामील झाल्या होत्या. आगीमध्ये या दोघींचा मृत्यू झाला असून कविताचा पती पियुष मात्र या आगीमधून वाचला आहे.

Post Bottom Ad