आपत्तकालीन दरवाजा नसल्याने मृतांच्या संख्येत वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2017

आपत्तकालीन दरवाजा नसल्याने मृतांच्या संख्येत वाढ


मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल परिसरात ट्रेड हाऊस इमारतीच्या गच्चीवर अनधिकृत जागेत पब चालवण्यात येत होता. या इमारतीत आपत्कालीन परिस्थितीमध्ये इमारतीबाहेर पडण्याचा मार्गच नसल्याचे समोर आले आहे. असा मार्ग नसल्याने अनेक लोक वर गच्चीवर अडकून राहिल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे.
कमला मिल परिसरात ट्रेड हाऊस या इमारतीच्या गच्चीवर 'वन-अबव्ह' पब आणि 'मोजोस ब्रिस्टोल' हॉटेल, पब आहे. या पबमध्ये दररोज अनेक युवक पार्ट्या करायला येतात. या परिसरात अनेक प्रसारमाध्यमांची कार्यालये आहेत. यात टाईम्स नाऊ, टीव्ही 9, झूम टीव्ही आणि रेडिओ मिर्ची यांचा समावेश आहेत. इमारतीच्या गच्चीवर पब असल्याने लिफ्टचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. पबमध्ये आग लागली तेव्हा दोन्ही पबमध्ये ५० हुन अधिक लोक होते. आग लागल्याने अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. काहींनी जीव वाचवण्यासाठी शौचालयाचा सहारा घेतला. मात्र त्यात धुरामुळे गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला. या इमारतीमधून बाहेर पडायचा इतर मार्ग नसल्याने अनेक लोक गच्चीवरच अडकले होते. त्यामुळे जखमींच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ झाली. इमारतीच्या तळमजल्यावर टीव्ही ९ चे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या जवळून एक जिना आहे, मात्र या जिन्यावरून वर खाली आले तरी पबकडे ये जा करणे शक्य नव्हते. यामुळे ट्रेड हाऊस हि इमारत उभारताना आपत्कालीन दरवाजा ठेवला नसताना पालिकेने संबंधितांवर कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Post Bottom Ad