कमला मिल दुर्घटना - पबचं बांधकाम अनधिकृत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2017

कमला मिल दुर्घटना - पबचं बांधकाम अनधिकृत


मुंबई । प्रतिनिधी - लोअर परळ इथल्या कमला मिल परिसरात वन अबव्ह व मोजोस पबला रात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. तर ५५ जण जखमी झाले. मोकळया जागेत अनधिकृत बांधकाम करून हा पब सुरु होता. यांनी कमला मिल कंपाऊंडमधील अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी महापालिकेकडे याविरोधात रीतसर तक्रार नोंदवली होती. इथे अग्नि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा त्यांनी आरोप केला होता. यासंदर्भात महापालिकेने नोटीस पाठवूनही याची दखल घेतली नाही. याबाबत स्थानिक पालिका अधिकाऱ्यांना तक्रार करूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.

वन अबव्ह पबकडे हॉटेलचा परवाना आहे, पण आग लागली त्या मोकळ्या जागेचा ते अनाधिकृत वापर करत होते. त्यामुळे २७ मे २०१७ला या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या जागेचा वापर त्यांच्याकडून सुरू होता. त्यामुळे ४ ऑगस्ट २०१७, त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी तसंच २७ ऑक्टोबरला नोटीस देऊन या मोकळ्या जागेचा वापर बंद करण्यात यावा, असं पालिकेने कळविले आहे. मात्र या नंतरही पब मालकाकडून मोकळ्या जागेचा वापर केला जात होता. याबाबत स्थानिक राजकीय कार्यकर्ते कसालकर यांनी पालिकेकडे तक्रार केली होती. कमला मिलमधील वन अबव्ह या क्लबमधील आगीच्या दुर्घटनेनंतर या परिसरातील सर्वच कार्यालयाची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांचे अनाधिकृत आणि वाढीव तसेच नियमबाह्य बांधकाम झाल्याचं आढळून येईल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. 

Post Bottom Ad