Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

नववर्षाच्या स्वागतासाठी रेल्वेच्या विशेष लोकल


मुंबई । प्रतिनिधी - नवर्षांच्या स्वागतासाठी मुंबईकर नागरिक चौपाटी, मारिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया अश्या ठिकाणी जाणे पसंद करतात. नववर्षाचे स्वागत केल्यावर रात्री उशिरा हे नागरिक परत आपल्या घरी जातात. अश्या नागरिकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने आठ तर मध्य रेल्वेने चार विशेष लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी गेट वे आणि मरीन ड्राइव्ह येथे जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.

मध्य रेल्वेवर सीएसएमटीहून रात्री १.३० वाजता कल्याण आणि पनवेल साठी विशेष लोकल चालवली जाणार आहे. हि लोकल कल्याण येथे तीन वाजता पोहचेल. तर पनवेल येथे २.५० वाजता पोहचेल. तसेच कल्याण आणि पनवेल येथून प्रवास करणाऱ्यांसाठी कल्याण येथून रात्री १.३० वाजता विशेष लोकल सुटेल ती सीएसटीएमला ३ वाजता पोहचेल. पनवेल येथून १.३० वाजता सुटणारी विशेष लोकल सुटून सीएसएमटीला २.५० वाजता पोहचेल.

पश्चिम रेल्वेवर स्पेशल – १ लोकल चर्चगेटवरून मध्यरात्री १.१५ वाजता सुटून पहाटे २.५५ वाजता विरारला पोहचेल. तर चर्चगेटच्या दिशेला स्पेशल -२ लोकल विरारहून रात्री १२.१५ वाजता सुटून चर्चगेटला रात्री १.४७ वाजता पोहचेल. स्पेशल -३ लोकल चर्चगेटहून रात्री २ वाजता सुटून विरारला पहाटे ३.४० वाजता पोहचेल. स्पेशल -४ लोकल विरारहून रात्री १२.४५ वाजता सुटून चर्चगेटला रात्री २.१७ वाजता पोहचेल. तर स्पेशल -५ लोकल चर्चगेटहून रात्री २.३० वाजता सुटून विरारला पहाटे ४.१० वाजता पोहचेल. स्पेशल -६ लोकल विरारहून रात्री १.४० वाजता सुटून चर्चगेटला रात्री ३.१२ वाजता पोहचेल. स्पेशल-७ लोकल चर्चगेटवरून रात्री ३.२५ वाजता सुटून विरारला पहाटे ५.०५ वाजता पोहचेल. स्पेशल-८ लोकल विरारहून रात्री ३.०५ वाजता सुटून चर्चगेटला पहाटे ४.३७ वाजता पोहचेल.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom