Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

हार्बर मार्गावर २७ ते २९ डिसेंबर ४८ तासांचा मेगाब्लॉक सुरु


मुंबई । प्रतिनिधी - २२ ते २५ डिसेंबरदरम्यान हार्बर मार्गावर बेलापूर ते उरण काम पूर्ण करण्यासाठी चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. २५ डिसेंबरला काम लवकर पूर्ण करण्याच्या नादात क्रॉस ओव्हरमध्ये ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करण्यात आली होती. याचा फटका बसल्यामुळे बेलापूर स्थानकाजवळ पेंटाग्राफचे नुकसान झाले आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा मंगळवारी कोलमडली होती. यामुळे बेलापूर स्थानकात दुरुस्तीसाठी २७ डिसेंबर व २८ डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. २७ डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजेपासून ते २९ डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत ४८ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे.

२२ ते २५ डिसेंबरदरम्यान हार्बर मार्गावर बेलापूर-उरण मार्गावरील काम पूर्ण करण्यासाठी चार दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. २५ डिसेंबरला दुपारी चार दिवसांचा विशेष ब्लॉक संपल्यानंतर लोकल फे-या सुरळीत होतील, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. हि अपेक्षा फोल ठरली. मंगळवारी (२६ डिसेंबरला) सकाळी कामानिमित्त प्रवासी निघाले असतानाच बेलापूर स्थानकाजवळ सकाळी ९.४० मिनिटांनी डाऊन दिशेला जाणाºया लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. यामुळे पेंटाग्राफचे नुकसान झाले. तसेच ओव्हरहेड वायरदेखील तुटली. यामुळे ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान ९.४० ते ९.५५ वाजेपर्यंत अप मार्गावरील लोकलवरदेखील याचा परिणाम झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी कुर्ला स्थानकातून सकाळी १०.३० मिनिटांनी दुरुस्ती करणारी ‘टॉवर वॅगन’ बेलापूर दिशेला रवाना झाली. सकाळी ९.५५ वाजता अप मार्ग सुरू करण्यात आला तर दुपारी १.०२ मिनिटांनी बिघाड दुरुस्त करून डाऊन लोकल सुरू करण्यात आली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत लोकलसेवा धीम्या गतीने सुरु होती. मंगळवारच्या बिघाडामुळे हार्बर मार्गावरील १४ लोकल फे-या पूर्णत: आणि १६ लोकल फे-या अंशत: रद्द करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. बेलापूर स्थानकात झालेल्या बिघाड दुरुस्तीसाठी पुन्हा २७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून व २९ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावर एकूण ६०४ फेऱ्या चालवण्यात येतात या ब्लॉक दरम्यान दोन्ही दिवशी प्रत्येकी ३४ फे-या रद्द केल्या आहेत. यात पनवेल-१८, नेरुळ-४, वाशी-१० आणि मानखुर्द-२ फे-यांचा समावेश आहे. पनवेल, वाशी, मानखुर्द, चेंबुर, बांद्रा आणि अंधेरी येथून येणा-या तथा जाणा-या अन्‍य सेवा आपल्‍या निर्धारित वेळे प्रमाणे चालतील. ट्रान्सहार्बर (ठाणे मार्गे हार्बर) वेळापत्रकानुसार धावणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

मेगाब्लॉक दरम्यान रेल्वेसेवा - 
> सकाळी गर्दीच्‍या वेळी ८ सेवापैकी बेलापुरहून प्रस्‍थान करणा-या ७ सेवा बेलापुर स्‍थानकातून प्लेटफार्म क्रमांक ३ वरून आणि १ सेवा वाशीवरून चालविण्‍यात येईल.
> सांयकाळी गर्दीच्‍या वेळी बेलापुरसाठीच्‍या ८ सेवांपैकी ५ सेवा पनवेल पर्यत आणि १ सेवा वाशीपर्यंत विस्‍तारित आणि २ सेवा रद्द राहतील.
> गर्दीच्‍या वेळी एकूण ६५ बेलापुर सेवांपैकी ३१ सेवा रद्द राहतील, १८ सेवांचे पनवेल पर्यंत विस्‍तार करण्‍यात येईल. ४ सेवा नेरल, १० वाशी आणि २ मानखुर्द पर्यंत चालविण्‍यात येतील.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom