विदर्भ राज्याबद्दल जनजागृतीसाठी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ - आमदार डॉ. देशमुख - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

11 January 2018

विदर्भ राज्याबद्दल जनजागृतीसाठी ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ - आमदार डॉ. देशमुख


मुंबई । प्रतिनिधी - विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच विदर्भाबद्दल जनतेची मते जाणून घेण्यासाठी ७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी ‘विदर्भ आत्मबळ यात्रेच्या माध्यमातून विदर्भातील ६२ मतदार संघ पालथी घातली जात आहेत. त्यात प्रथम टप्प्यात विदर्भातील ११ जिल्ह्यात भेटी देऊन विदर्भाबद्दल जनतेशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व बेरोजगार युवकांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी ‘विदर्भ आत्मबळ यात्रेचे’ आयोजन करण्यात आल्याची माहिती काटोलचे भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिली. तसेच फेब्रुवारी २०१८ मध्ये कस्तुरचंद पार्क नागपूर येथे भव्य युवक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

विदर्भाची सद्य परिस्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, उद्योगधंदे, लोडशेडिंग, कुपोषण, नक्षलवाद, विदर्भाचा सर्वांगीण विकास व इतर प्रश्नांवर नेहमीच विधानभवनात व विधानभवनाच्या बाहेरसुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘विदर्भाचा विकास हवा असेल, तर विदर्भ राज्याची निर्मिती करा’, ही स्पष्ट भूमिका आहे. मागील ६० वर्षात विदर्भातील सिंचनासाठी राखून ठेवलेला पैसा पश्चिम महाराष्ट्राकडे वळविण्यात आला. ह्याचाच दु:खद परिणाम म्हणजे कर्जबाजारी झालेल्या ३२ हजर शेतकऱ्यांच्या आत्महत्या. कापूस, सोयाबीन, संत्र, तांदूळ इत्यादी नगदी पिके असूनसुद्धा शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही कारण विदर्भात कृषी प्रक्रिया उद्योग नाहीत. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या धान उत्पादक जिल्ह्यात रोवणीच्या वेळी पाणी नसल्यामुळे बरेच ठिकाणी शेती पडीत ठेवण्यात आली आहे, त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. विदर्भात गुंतवणूक नाही त्यामुळे बेरोजगार युवक, व्यवसाय, उद्योग, आय.टी. कंपन्या, सोफ्टवेअर कंपन्यांना विकासाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांचे स्थलांतरण होत आहे. ही गंभीर परिस्थिती विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दिसून येते. यामुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत संघटना, युवक संघटना, महिला संघटना, शेतकरी, युवक, डॉक्टर, इंजिनिअर तसेच व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत सर्व प्रतिनिधी व सर्वपक्षीय नेत्यांनी सर्व मतभेद विसरून विदर्भाच्या मुद्यावर एकत्र यावे व ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ यशस्वी करावी, असे आवाहन आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले आहे.

Post Top Ad

test
test