Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

१८ जानेवारीला मुंबई शहरात व पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा बंद राहणार


मुंबई । प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे माहीम येथील भूमिगत बोगद्याजवळ १२०० मिलीमीटर व्यासाच्या झडपेच्‍या दुरुस्तीचे काम १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. यामुळे मरोळ - मरोशी पासून माहीम – रुपारेल ते रेसकोर्स पर्यंतचा जलबोगदा १२ तासांकरीता बंद करावा लागणार असल्याने या कालावधीत मुंबई शहरात व पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार ‘ए’ विभागातील नरिमन पॉईंट, बॅकबे, कफ परेड, कुलाबा, नेव्‍ही नगर, नेवी, बोरीबंदर / साबुसिद्दीक क्षेत्र, रेल्वे झोन, ‘सी’ विभागातील बॅकबे क्षेत्र (नेताजी सुभाषचंद्र बोस रोड, ई आणि एस रोड), ‘डी’ विभागातील लिटिल गिब्ज रोड, रिज रोड, पेडर रोड,भुलाभाई देसाई रोड, वाळकेश्वर रोड, नेपियन्सी रोड, कारमेकल अल्टामाऊंट रोड, ताडदेव रोड व एम पी मिल क्षेत्र, ई’ विभागातील बाई य. ल. नायर आणि कस्तुरबा रुग्‍णालय, ‘जी/उत्तर’ विभागातील सिटी सप्लाय क्षेत्र (एस.एल. रहेजारोड, मोदी रोड, एल.जे. रोड, एस.व्ही.एस. रोड, टि.एच.कटारीयारोड, बाळ गोविंददास रोड, रानडे रोड, सेनापती बापट मार्ग,गोखले रोड, एन.सी.केळकर रोड, एस.के.बोले रोड, भवानी शंकर रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग), ‘जी/दक्षिण’विभागातील (पूर्णतः) सिटी सप्लाय क्षेत्र (बी.डी.डी. चाळ एन.एम.जोशी मार्ग, ए.बी. रोड, सेनापती बापट रोड, एस.व्ही.एस. रोड, गणपतराव कदम मार्ग, पांडुरंग बुधकर रोड, वरळीकोळीवाडा), सखुबाई मोहिते मार्ग, बुध्द टेम्पल, अहुजा सप्लाय आणि ९०० मि.मी. व्यासाचा वरळी टेकडी जलाशय आऊटलेट क्षेत्र (वरळी बी.डी.डी. चाळ), ‘एच/पश्चिम’वि‍भागातील जनरल क्षेत्र, वांद्रे रिक्लमेशन, पेरीरोड, चॅपल रोड, बी.जे.रोड, खारदांडा, दिलीप कुमार क्षेत्र, कोलडोंगरी, झिकझॅक रोड, पालीमाला रोड, बाजार रोड आणि युनियन पार्क क्षेत्र या भागात पाणीपुरवठा होणार नाही. याची नागरीकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom