वांद्रे, खार, सांताक्रूझ, अंधेरी येथील अनधिकृत बांधकामे तोडली - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

07 January 2018

वांद्रे, खार, सांताक्रूझ, अंधेरी येथील अनधिकृत बांधकामे तोडली


मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल येथील आगी नंतर जाग आलेल्या मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली होती. काही कारणास्तव थांबलेली कारवाई रविवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वांद्रे पश्चिम, सांताक्रुझ पश्चिम, खार पश्चिम तसेच अंधेरी पश्चिम येथील अनधिकृत बांधकामांवर अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, परिमंडळ – ३ चे उपायुक्त आनंद वागराळकर व परिमंडळ – ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार पालिकेने कारवाई केली.

वांद्रे पश्चिम, सांताक्रुझ पश्चिम व खार पश्चिम परिसरात असणा-या अनेक मोठ्या हॉटेल्समधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेद्वारे धडक कारवाई करण्यात येत आहे. वांद्रे पश्चिम परिसरातील 'वॉटरफिल्ड रोड व तिसाव्या रस्त्याच्या जंक्शनवर असणाऱ्या चायना गेट हॉटेलच्या वर तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या लागुना बार चे २ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. तर तिसाव्या व सोळाव्या रस्त्याच्या जंक्शन वरील 'कॅफे बांद्रा' येथील ६०० चौरस फुटांचे बांधकाम देखील तोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे लगुना बार चे अनधिकृत बांधकाम दोनच महिन्यांपूर्वी नोव्हेंबर २०१७ मध्ये देखील तोडण्यात आले होते. मात्र संबंधितांनी या ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकाम केले होते. याबाबत संबंधितांद्वारे न्यायालयात आणि महापालिकेच्या इमारत प्रस्ताव खात्याकडे दावा / विनंती अर्ज देखील दाखल करण्यात आला होता. मात्र या दोन्ही ठिकाणी सादर दावा / विनंती अर्ज फेटाळण्यात आल्याने सदर बांधकामावर महापालिकेद्वारे पुन्हा कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती 'एच पश्चिम' विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

तसेच अंधेरी पश्चिम परिसरातील न्यू लिंक रोड वरील चायना गेट रेस्टॉरंट व टॅप रेस्टॉरंट मधील २ हजार चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे, अशी माहिती 'के पश्चिम' विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे. अंधेरी पश्चिम परिसरात असणा-या न्यू लिंक रोड वरील रॉयल प्लाझा को ऑपरेटिव्ह सोसायटी मधील तळ मजल्यावर असणाऱ्या टॅप रेस्टॉरंट च्या मागील व पुढील बाजूस अनधिकृत शेड उभारून त्याचा 'डायनिंग एरिया'सारखा वापर केला जात होता. तर याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या चायना गेट रेस्टॉरंट मध्ये देखील अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. याबाबत या दोन्ही उपहारगृहांना मुंबई महापालिका अधिनियम ३५१ नुसार यापूर्वीच नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन्ही उपहारगृहातील अनधिकृत बांधकाम गेल्या दोन दिवसात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान तोडण्यात आले.

Post Top Ad

test
test