बेस्टच्या भंगार बसचे फिरत्या शौचालयात रूपांतर करा - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

01 January 2018

बेस्टच्या भंगार बसचे फिरत्या शौचालयात रूपांतर करा


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालये नसल्याने नागरिकांची कुचंबना होते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबईत फिरती स्वच्छतागृहे सुरू करावीत अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिकेकडे केली आहे.

मुंबईत लहान-मोठ्या रस्त्यांजवळ फिरती शौचालये नसल्याने वृद्ध, महिला, मुले, मधुमेही रुग्ण यांची मोठी गैरसोय होते. यातच फूटपाथवर कोणतेही बांधकाम करण्यास मनाई असल्यामुळे स्वच्छतागृहे उभारण्यात येत नाहीत. स्वच्छतागृहे नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. या पार्श्वभूमीवर फिरती स्वच्छतागृहे सुरू करावीत अशी मागणी पडवळ यांनी केली आहे. मुंबई पोलिसांनी अलीकडे बंदोबस्तावर असलेल्या कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी पोलीस व्हॅनचे स्वच्छतागृहात रूपांतर केले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने ‘बेस्ट’ने भंगारात काढलेल्या बसगाड्यांचे सुसज्ज फिरत्या शौचालयात रूपांतर करावे आणि हे फिरते शौचालय लहान आणि मोठ्या रस्त्यांवर उपलब्ध करून द्यावे असे सचिन पडवळ यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.

Post Top Ad

test
test