Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

भारत नेटच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र देशात उत्कृष्ट


नवी दिल्ली - देशातील 1 लाखाहून अधिक ग्रामपंचायती ‘भारतनेट’ च्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र हे ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ ठरले आहे. राज्यात 12 हजारांहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश (पूर्व) मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, आणि झारखंड ही राज्ये सुद्धा भारत नेट च्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट ठरली आहेत. 

शात 31 डिसेंबर 2017 अखेर 2 लाख 54 हजार 895 किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे निर्माण केले गेले याद्वारे हायस्पीड ब्रॉडबँड सेवेने देशातील 1 लाख 1 हजार 370 ग्राम पंचायतींना‘भारत नेट’ च्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेने जोडण्यात आले आहे. ‘भारतनेट’ च्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्याच्या केलेल्या कामाबद्दल महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील 12 हजार 378 ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. तर 14 हजार 878 ग्रामपंचायतींमध्ये‘भारतनेट’ च्या कामास सुरुवात झाली आहे. 


Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom