भीम आर्मीचा दणका - संभाजी भिडेंचा मुंबईतील कार्यक्रम रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 January 2018

भीम आर्मीचा दणका - संभाजी भिडेंचा मुंबईतील कार्यक्रम रद्द


मुंबई । प्रतिनिधी - भिमा कोरेगाव प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले असतानाच मुंबईत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम रविवारी ७ जानेवारीला आयोजित करण्यात आला होता. भीमा कोरेगांव येथील घटनेस शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे जबादार असून त्यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संभाजी भिडे यांचे व्याख्यान रद्द करावे अशी मागणी भीम आर्मीने पोलिसांकडे केली होती. त्यानंतरही कार्यक्रम झाल्यास तो कार्यक्रम उधळून लावू असा इशारा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी दिला होता. यामुळे शिवप्रतिष्ठान या संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने 7 जानेवारी रोजी होणारा भिडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली.

भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या दंगलीप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भीम आर्मीने या संदर्भात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी पोलिस महासंचालक तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. भिमा कोरेगाव आणि वढू येथील 1 जानेवारी रोजी आंबेडकरी जनतेवर आणि वाहनांवर हल्ला तसेच जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवस राज्यात उफाळलेला प्रक्षोभ पाहता शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम रद्द करावा असे निवेदनात म्हटले आहे. भिडे यांचा कार्यक्रम रद्द केला नाही. राज्यात पुन्हा जनप्रक्षोभ वाढण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही. तसेच मुंबईत छात्र भारती या संघटनेच्या वतीने आयोजित आमदार जिग्नेश मेवानी, कपिल पाटील विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या व्याख्यानाचा बंद सभागृहात होणारा कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला आहे. त्याच प्रमाणे संभाजी भिडे यांचाही कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी अशोक कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सांगली तसेच पुणे शहरात मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. तसेच समस्त हिंदू आघाडीचे कार्याघ्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात भिमा कोरेगाव येथे दंगल भडकवल्या बाबतचा आरोप करण्यात आला असून तसा गुन्हा दाखल करण्या आला आहे. सदर बाब लक्षात घेता शिवप्रतिष्ठान आयोजित संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

दरम्यान ७ जानेवारीला होणारे नियोजित व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी वातावरण निवळल्यानंतर व्याख्यान घेणार असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. लालबाग येथील मेघवाडीत भिडे गुरुजींचे व्याख्यान होणार होते. पण पोलिसांनी विनंती केल्याने व्याखान पुढे ढकलण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. व्याख्यानाची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल. कोरेगाव भीमा प्रकरणात गुरुजींना गोवण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला. या व्याख्यानाच्या आडून कोणताही घातपात होऊ नये, म्हणून केवळ व्याख्यान पुढे ढकलत आहोत. कोरेगाव भीमा प्रकरणातील खरा सूत्रधार भेटल्यावर पुन्हा सभेचे आयोजन केले जाईल, असा दावा संघटनेचे चेतन बारस्कर यांनी केला आहे.

Post Bottom Ad