Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

३ जानेवारीला महाराष्ट्र बंद - अॅड. प्रकाश आंबेडकर


मुंबई - भीमा कोरेगाव येथील सणसवाडीत झालेल्या हिंसक घटनेचे मंगळवारी मुंबईसह महाराष्ट्रात पडसाद उमटले. मिलिंद एकबोटे अाणि संभाजी भिडे हे प्रमुख असलेल्या हिंदू एकता अाघाडी अाणि शिवराज प्रतिष्ठानने दादफेक आणि गाड्यांची जाळपोळ केल्याने हि घटना घडली. यामुळे मिलिंद एकबोटे अाणि संभाजी भिडे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंद केला जाणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली. 

भीमा कोरेगांवच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना सोमवारी ही घटना घडली, तेव्हा मी या घटनेची कल्पना मुख्यमंत्री अाणि गृहराज्यत्री रणजीत पाटील यांना दिली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत दोघांनाही या घटनेची माहिती नव्हती. ग्रामीण एसपीना या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला असता त्यांचा फोन आऊट ऑफ कव्हरेज एरिया होता. कोरेगाव येथे जाणाऱ्या रस्त्यावरील शिरूर ते चाकण गावांमधील घरांच्या छतावर आधीच दगड ठेवण्यात आले होते. पोलीस वेळेवर पोहचले असते तर या घटनेला हिंसक वळण लागले नसते. पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. 

छत्रपती संभाजी राजे यांच्यावर अंत्यसंस्कार ज्यांनी केले त्या गोविंद (गणपत) महार यांची वढू बु येथील समाधी उध्वस्त केल्याप्रकरणी ग्रामस्थांवर शासनाने गुन्हे दाखल केले. ग्रामस्थांच्या आणि सरकारच्या मधील भांडणांत विजयस्तंभावर अभिवादन करण्यास आलेल्या भीम सैनिकांवर दगडफेक करून गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. भीम सैनिकांचा आणि हिंसाचार करणाऱ्यांचा एकमेकांशी संबंध नव्हता. मात्र तरीही आंबेडकरी अनुयायांना यामध्ये लक्ष्य करण्यात आले. याचे पडसाद सर्वत्र उमटले आहे. पोलिसांनी त्वरित कोम्बिंग ऑपरेशन थांबवावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा आंबेडकर यांनी दिला.
  
मुंबईसह महाराष्ट्रात मंगळवारी बंद पुकारण्यात आला. रास्ता रोको करण्यात आला. याबाबत बोलताना कार्यकर्त्यांनी बंद पुकारला असेल तर मागे घ्यावा, आंदोलन थांबवावे, बंदच्या काळात सर्वसामान्यांना त्रास होईल असे काही करु नका. सर्वांनी संयम बाळगून शांतता राखावी असे आवाहन आंबेडकर यांनी केले.  हिंदुत्ववादी संघटनांना या कारस्थानात मदत करणाऱ्या कोरेगाव ते शिरूर अाणि कोरेगाव ते चाकण परिसरातील गावांचे अनुदान दोन वर्षांसाठी बंद करावे, अशी मागणी प्रकाश अांबेडकर यांनी केली. महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, एल्गार परिषद इत्यादी अडीचशे संघटनांचे फ्रंट, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी बंदचे आवाहन केला आहे. या बंदला सर्व संघटनांनी पाठिंबा द्यावा असे आवाहनही आंबेडकर आणि केले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom