Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गिरगांव येथील बिर्ला क्रिडा केंद्राच्या जागी जेट्टी उभारणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईच्या सुप्रसिद्ध असलेल्या गिरगांव चौपाटीवर पर्यटन वाढावे म्हणून बिर्ला क्रिडा केंद्र बंद करून त्या जमिनीवर जेट्टी (बहुहुद्देशीय धक्का) उभारली जाणार आहे. त्यासाठी पालिकेच्या ताब्यातील हा भूखंड मुंबई पोर्ट ट्रस्टला देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या सुधार समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

गिरगांव येथील ५८५२.८९ चौरस मिटर भूखंड १ रुपये प्रतिवर्ष भाड्याने ९९ वर्षांसाठी बिर्ला क्रिडा केंद्राला १९६५ा साली देण्यात आला होता. या जागेमध्ये २७९१ चौरस मिटरवर बिर्ला क्रिडा केंद्राचे कार्यालय, सभागृह, तालीम कक्ष उभारण्यात आले आहे. तर गच्चीवर बगीचा वाव उपहार गृह बांधण्यात आले आहे. सध्या हे सभागृह मोडकळीस आल्याने दुरुस्ती कामांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. तर दोन तालीम कक्ष नाममात्र शुल्क आकारून नृत्य व नाटकांच्या तालिमीकरिता देण्यात येतात. तसेच या केंद्रामधील ७८३ चौरस मीटर जागा ठक्कर कॅटरर्सला देण्यात आली आहे.

बिर्ला क्रिडा केंद्राच्या जागेवर केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयाने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून मुंबई बंदर, पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या जागेवर जेट्टी उभारली जाणार असून मरीन ड्राइव्हला हि जेट्टी जोडली जाणार आहे. या कामासाठी क्रिडा केंद्राची मोकळी जागा आणि अस्तित्वात असलेली इमारत प्रवाशांच्या आगमनाच्या व निर्गमनाच्या टर्मिनल इमारतीसाठी, प्रसाधन गृह, भांडार कक्ष, उपहार गृह, हॉटेल उभारणीसाठी वापरली जाणार आहे. त्याबदल्यात कोस्टल रोडच्या कामासाठी मुंबई महापालिकेला मुंबई पोर्ट ट्रस्टकडून ५०० चौरस मीटरची जागा दिली जाणार आहे. तसा प्रस्ताव सुद्धार समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom