गिरगांव बिर्ला क्रीडा केंद्रावरून शिवसेना भाजपात खडाजंगी - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

23 January 2018

गिरगांव बिर्ला क्रीडा केंद्रावरून शिवसेना भाजपात खडाजंगी


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईमधील पर्यटन वाढवण्यासाठी गिरगाव चौपटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या इमारतीची संपूर्ण जागा ताब्यात घेऊन तेथे बहुउद्देशीय धक्का (जेट्टी) बांधण्याचा मानस भाजपा सरकारचा आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या सुधार समितीत आला असता शिवसेनेने हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवत भाजपचा मनसुबा शिवसेनेने सुधार समितीत हाणून पाडला. बिर्ला क्रीडा केंद्रात अनेक कलाकार घडले आहेत. बहुउद्देशीय प्रकल्प उभारायचा असेल तर शासनाकडे इतर जागा आहेत, तिथे त्यांनी हा प्रकल्प उभारावा असे सांगत जेट्टी उभारण्यास शिवसेनेने विरोध केला. यावर भाजपनेही विकासासाठी जेट्टी उभारण्यासाठीची मागणी लावून धरली. यावर शिवसेना - भाजपची खडाजंगी झाली. दरम्यान सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी जेटटी बांधण्याचा हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवला.

बिर्ला क्रिडा केंद्राच्या जागेवर जेट्टी उभारण्यासाठी शिपिंग कॉर्परेशनच्या माध्यमातून मुंबई पोर्ट ट्रस्टने ही जागा मागितली आहे. सदर जागेवर जेट्टी बांधण्यासाठी शासनाने मागितली आहे. येथे मोठे पर्यटन स्थळ उभे राहिल्यास विकास होऊन अनेकांना रोजगार मिळेल. त्यामुळे विकासाच्या प्रस्तावाला विरोध न करता मंजूर करावा अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केली. मात्र याला शिवसेनेने तीव्र विरोध करून आतापर्यंत विकास कुठे आहे, तो आम्ही शोधतो आहोत, असा टोला शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी लगावला. जे आहे, ते नष्ट करायचे व जे हवेत आहे, त्याबाबतची स्वप्ने दाखवायची असेही पेडणेकर यांनी म्हटले. तर बिर्ला क्रीडा केंद्राच्या माध्यमातून येथे अनेक कलाकार घडले आहेत. ही ऎतिहासिक वास्तूत दडलेल्या अनेक आठवणी पुसून टाकू नये याला आमता तीव्र विरोध आहे, असे शिवसेनेचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी स्पष्ट केले. येथे बिर्ला क्रि़डा केंद्राला पर्यटन क्षेत्रासाठी जेट्टी बांधण्यासाठी जमीन मागितली जाते आहे. मात्र शासनाकडे अनेक जागा आहेत, तेथे उभारावे. पर्यटनाच्या नावाखाली जेट्टीच उभारायचे आहे की अजून काही असा प्रश्नही शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी उपस्थित केला. तर येथे पर्यटन स्थळ उभे राहणार आहे त्या माध्यमातून विकास होणार आहे, उत्पन्नाचं साधन उभे राहणार असल्य़ाने विरोध कशाला असा सवाल विचारला. मात्र जेट्टी बांधण्याच्या या प्रस्तावा विरोधात शिवसेनेने आक्रमक होऊन हा प्रस्ताव हाणून पाडला.

Post Top Ad

test
test