पालिकेचे स्टिकर्स असलेल्या वाहनांनाच रुग्णालयात पार्किंग - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

12 January 2018

पालिकेचे स्टिकर्स असलेल्या वाहनांनाच रुग्णालयात पार्किंग


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिका रुग्णालय परिसरात कोणत्याही ठिकाणी वाहने पार्किंग केली जातात. या पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे वाहन कोणते किंवा बाहेरील वाहन कोणते याची माहिती त्वरित मिळत नाही. त्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर पालिकेचे लोगो असलेले स्टिकर्स लावण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी केली.

महापालिकेच्या शीव, केईएम आणि नायर तसेच विभागीय रुग्णालयांमध्ये दिवसाला हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. तसेच या रुगणालयांमधून हजारो रुग्ण उपचारासाठी भरती झालेले असतात. रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या गर्दीबरोबरच वाहनांची गर्दीही पाहावयास मिळते. रुग्णालय परिसरात मोकळी जागा भेटल त्याठिकाणी वाहने पार्किंग केलेली असतात. काही वाहने तर कित्तेक दिवस पार्किंग केलेल्या ठिकाणाहून हलवली जात नाहीत. यामुळे रुग्णालयात स्वच्छता राखताना तसेच आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी कुठेही पार्किंग केलेल्या वाहनांमुळे अडचणी निर्माण होतात. रुग्णालय प्रशासनाकडे या वाहनांच्या मालकांची माहीत नसल्याने वाहनांच्या मालकांचा शोध घ्यायचा झाल्यास ते शक्य होत नाही. यामुळे वाहने हटविताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचे सईदा खान यांनी सांगितले.

रुग्णालय परिसरात पार्किंग केलेल्या वाहनांमधून पेट्रोल, डिझेलची गळती होऊन दुर्घटना झाल्यास मोठी जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. तसेच, रुग्णालयात प्रवेश करताना सुरक्षारक्षकांकडून वाहनांची तपासणी केली जात नाही. यामुळे वाहनांमधून स्फोटके आणून रुग्णालयामधून एखादी मोठी दुर्घटना घडवला जाऊ शकतो अशी भीती सईदा खान यांनी व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर लावण्यासाठी पालिकेचे लोगो असलेले रुग्णालयांचे स्टिकर्स देण्याची मागणी खान यांनी केली. यावर अद्याप महापालिकेने असे नियम तयार केलेले नाही. मात्र, रुग्णालय प्रशासनाच्या माहितीसाठी आणि प्रशासकीय किंवा शासकीय गाड्या ओळखण्यासाठी लोगो असलेले स्टिकर देण्यात यावे असे निर्देश आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे यांनी प्रशासनाला दिले.

Post Top Ad

test
test