Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अनधिकृत बांधकामाविरोधातील पालिकेची कारवाई मंदावली


सोमवारी फक्त ५३ ठिकाणीच कारवाई -
मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल परिसरात पबना लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या १४ जणांच्या मृत्यू नंतर जागे झालेल्या पालिकेने शनिवार पासून सुरु केलेली कारवाई सोमवारी काही प्रमाणात थंडावली आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी धडक कारवाई करणाऱ्या पालिकेने सोमवारी 'इ', 'एन' व 'जी दक्षिण' या तीन विभागांत १३४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५३ ठिकाणी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तर 'इ' विभागातील नायर मार्गावर 'शोले हुक्का पार्लर'वर धडक कारवाई करण्यात येऊन ५० हुक्का व संबंधित साहित्य तात्काळ जप्त करण्यात आले आहे.

कमला मिल आगी नंतर उपाहरगृहे, हॉटेल्स इत्यादींमधील अनधिकृत / बेकायदेशीर बाबींची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान आढळून आलेल्या अनियमिततांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात पालिकेने १२४० आस्थापनांची पाहणी केली. नियमबाह्य काम केलेल्या ६७१ आस्थापनांवर तोडकी कारवाई करण्यात आली. ३७ आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे. तर तब्बल ८४३ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. सोमवारी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान 'इ' विभागात ४७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी २० ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली.यामध्ये जमजम हॉटेल व किंग कबाब या उपहारगृहांचा समावेश आहे. याच कारवाई दरम्यान विनापरवानगी साठा केलेले २३ सिलिंडर जप्त करण्यात आले. 'जी दक्षिण' विभागात ४१ आस्थापनांची तपासणी करण्यात येऊन अनियमितता आढळलेल्या १५ ठिकाणी निष्कासन कारवाई करण्यात आली.यामध्ये रघुवंशी मिल मधील शिशा रेस्टॉरंट वर कारवाई करण्यात आली. याच विभागातून १० सिलिंडर देखील जप्त करण्यात आले. तर 'एन'विभागात ४६ ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यापैकी १८ ठिकाणी कारवाई करण्यात आली. तसेच १८ सिलिंडर देखील जप्त करण्यात आले आहेत

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom