Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबई महापालिका चायनामेडच्या प्रेमात !

पेशंटच्या तपासणीसाठी चायनामेड मल्टिपॅरामीटर -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिका आणि रुग्णालय प्रशासनाचे "मेड इन चायना" वस्तूंवरील प्रेम काही केल्या कमी होताना दिसत नाही. स्थायी समितीत दिड वर्षांपूर्वी चायनामेड २७५ ‘मल्टिपॅरामीटर पेशंट मॉनिटर’ मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव केवळ चायनामेड असल्याने नामंजूर करण्यात आला होता. मात्र असाच प्रस्ताव पुन्हा सादर केल्याने या प्रस्तावाला स्थायी समिती मंजुरी देते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

‘मल्टिपॅरामीटर पेशंट मॉनिटर’ हे यंत्र रुग्णांच्या ईसीजी, ब्लडप्रेशर, ऑक्सिजन सॅच्युरेशन, ईटीसीओटू, रेस्पिरेशन, तापमान आदी परिमाण निरीक्षणासाठी या यंत्राचा वापर केला जातो. जुलै २०१६ मध्ये महापालिकेच्या स्थायी समितीत विविध रुग्णालयांसाठी २७५ ‘मल्टिपॅरामीटर पेशंट मॉनिटर’ मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव मशीन चायनामेड असल्याने नामंजूर करण्यात आला होता. महापालिकेच्या केईएम, सायन, बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर धर्मादाय पालिका रुग्णालय, १ उपनगरीय रुग्णालये, कुपर रुग्णालय आदीं रुग्णालयात ‘मल्टिपॅरामीटर पेशंट मॉनिटर’ लावले जाणार होते. चायनामेड मशीनची दुरुस्ती व देखभाल करणे शक्य नसल्याने ही यंत्रे भंगारात जात असल्याने भारतीय बनावटीची यंत्रे खरेदी करण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीने त्यावेळी दिले होते. त्यानंतरही पालिकेने रुग्णालयासाठी चायनामेड मोबाईल डिजिटल रेडिओग्राफी एक्स-रे मशीन खरेदी करण्याचा प्रस्तावसुद्धा सादर करण्यात आला होता.

आता पुन्हा असाच एक प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानूसार केईएम रुग्णालयाकरिता १०५ नग, नायर रुग्णालयाकरिता ४१ नग, सायन रुग्णालयाकरिता ३९, कस्तुरबा रुग्णालयाकरिता ३०, कूपर रुग्णालयाकरिता २० व प्रमुख वैद्यकीय अधिक्षक, उपनगरीय रुग्णालयाकरिता (माध्यमिक आरोग्य सेवा) ४० असे एकूण २७५ ‘मल्टिपॅरामीटर पेशंट मॉनिटर’ खरेदी केले जाणार आहेत. मे. शेनझेन मिंड्रे बायो - मेडिकल इलेक्ट्रॉनिक कंपनी लिमिटेड या चायना कंपनीने बनविलेले ‘मल्टिपॅरामीटर पेशंट मॉनिटर’ पालिका खरेदी करणार आहे. या यंत्राचा पुरवठा, उभारणी, चाचणी, कार्यान्वित करणे आणि त्या यंत्राचे ५ वर्षे परिरक्षण करणे यासाठी मे. विशाल सर्जिकल इक्विपमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या पुरावठादाराला महापालिका १२ कोटी ६२ लाख ७६ हजार ३४५ रुपये अदा करणार आहे. या यंत्राचा हमी कालावधी ३ वर्षे असणार आहे. स्थायी समितीने याआधी चायनामेड यंत्र खरेदी करण्यास नकार दिल्याने ‘मल्टिपॅरामीटर पेशंट मॉनिटर’ खरेदी करण्याच्या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे.

कसे होणार १२ कोटी खर्च -
‘मल्टिपॅरामीटर पेशंट मॉनिटर’ या यंत्राची किंमत २ लाख ९२ हजार ७४४ रुपये आहे. २७५ नग खरेदीची किंमत ८ कोटी ५ लाख ४ हजार ६०० रुपये इतकी होते. मात्र कस्टम ड्युटी, शैक्षणिक कर, आयजीएसटी व बँकेचा सोडवणूक आकार इत्यादीसाठी १ कोटी ६७ लाख १९ हजर १९५ रुपये, रुपयांतील घसरण बघता ४ टक्के सादिलवार रक्कम म्हणून ३८ लाख ८८ हजर ९५१ रुपये, स्थानिक उपसाधनांचा दर म्हणून १ कोटी २४ लाख ३० हजार ४४० रुपये व परिरक्षण खर्च म्हणून १ कोटी २७ लाख ३३ हजार १६० रुपये इत्यादी खर्चासह एकूण १२ कोटी ६२ लाख ७६ हजार ३४५ रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिका यंत्रांच्या खरेदीची किंमत पुरवठादाराला डॉलरमध्ये अदा करणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom