रस्ते घोटाळ्याचा दुसरा अहवाल येत्या पंधरा दिवसात? - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

07 January 2018

रस्ते घोटाळ्याचा दुसरा अहवाल येत्या पंधरा दिवसात?


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या रस्ते घोटळ्यातील २३४ रस्त्यांपैकी ३४ रस्त्यांचा अहवाल शनिवारी जाहीर करण्यात आला. ३४ रस्त्यांच्या चौकशी अहवालाअंतर्गंत ९६ अभियंत्यांवर कारवाई झाली. उर्वरित २०० रस्त्यांचा अहवाल येत्या पंधरादिवसात सादर होणार आहे. ३५२ कोटींचा हा रस्ते घोटाळा असून यात मोठ्या प्रमाणात कंत्राटदार आणि अभियंत्यांवर कारवाई केली जाणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

मुंबईतील तब्बल २३४ रस्त्यांच्या कामांतील ३५२ कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. पहिल्या टप्प्यातील अहवालात काही कंत्राटदार आणि दोन पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. त्यानंतर ३४ रस्त्यांचा अहवाल नुकताच आयुक्तांना सादर झाला. यात पालिकेतील १०० अभियंत्याची चौकशी करण्यात आली. यात तब्बल ९६ अभियंत्याना दोषी ठरविण्यात आले. ४ अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. या कारवाईमुळे पालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कारण अजून ही २०० रस्त्यांचा चौकशी अहवाल बाकी आहे. या अहवालाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून येत्या पंधरदिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. या अहवालात मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे. तसेच कंत्राटदारांसह अभियंते ही अडकण्याची शक्यता असल्याने पालिकेतील सर्वात मोठी कारवाई असल्याची नोंद होणार आहे. तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी रस्त्याच्या कामात ८०% भ्रष्टाचार आणि २० % काम होत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी चौकशी समिती नेमून रस्ते कामातील घोटाळा उघडकीस आणून कारवाईला सुरुवात केली. दोन वर्षानंतर ही कारवाई अद्याप सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या अहवालात कोण कोण अडकणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

Post Top Ad

test
test