रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंगसाठी १५ कोटींची उधळपट्टी - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

14 January 2018

रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंगसाठी १५ कोटींची उधळपट्टी


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई शहरात ठिकठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग, विराम रेषा, विराम खुणा, बस थांब्याकरिता पिवळ्या रंगाचे पट्टे यासाठी रस्त्यावर रंग मारला जातो. मात्र हा रंग तीन ते चार दिवसात उडून जात असल्याने अनेकवेळा यावर टिका झाली आहे. मात्र त्यानंतर या कामांसाठी पालिका सातत्याने प्रस्ताव आणून रस्त्यावर रंग मारण्यासाठी करोडो रुपयांची उधळपट्टी करत आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

मुंबई शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीला शिस्त लागावी, वाहतूक सुरक्षित व अपघात विरहीत व्हावी या बहुउद्देशाने मुंबई महापालिकेतर्फे रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग, विराम रेषा, विराम खुणा, बस थांब्याकरिता पिवळ्या रंगाचे पट्टे इत्यादीसाठी थर्मोप्लास्टिक रंगसाहित्य पुरविणे व रंगविणे यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शहर विभागातील परिमंडळ १ मध्ये काही महत्वाच्या रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग, विराम रेषा, विराम खुणा, बस थांब्याकरिता पिवळ्या रंगाचे पट्टे मारण्यासाठी कंत्राटदार मे. भारत कन्स्ट्रक्शनला ३.६१ कोटी रुपये, परिमंडळ २ मध्ये याच कामासाठी कंत्राटदार मे. कॉम्प्युटर इंजिनियर्सला ३.७१ कोटी रुपये, उपनगरातील परिमंडळ ३ मध्ये मे. राजदीप एंटरप्राइजेसला २.३९ कोटी रुपये, उपनगरातील परिमंडळ ४ मध्ये याच कामासाठी कंत्राटदार मे. वैभव एंटरप्राइजेसला २.५५ कोटी रुपये, पूर्व उपनगरातील परिमंडळ ५ मध्ये मे. डी. बी. इन्फ्राटेकला १.५५ कोटी रुपये, पूर्व उपनगरातील परिमंडळ ६ मध्ये मे. सुभाष एंटरप्राइजेसला १.४४ कोटी रुपये आणि परिमंडळ ७ मध्ये मे. राजदीप एंटरप्राइजेसला १.७२ कोटी रुपये असे एकूण एकूण १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये अनेक वेळा सदस्यांनी कंत्राटदारांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कंत्राटदारांनी लावलेला रंग चार दिवसात उडून जातो. कंत्राटदार पुन्हा त्या ठिकाणी रंग लावत नाहीत, कंत्राटदाराने ज्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग इत्यादी रंग काम केले आहे त्याची पाहणी करावी नंतरच त्यांना कामे द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंगच्या नावाने रंगकाम करणारा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असल्याने येत्या स्थायी समितीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

Post Top Ad

test
test