Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

२०१८ मध्ये कोस्टल रोड, वस्त्रोद्योग संग्रहालयाच्या उभारणीस सुरुवात होणार

मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेने महत्वाकांक्षी असलेला कोस्टल रोड प्रकल्प एप्रिलमध्ये सुरु होईल. मुलुंड क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याच्या कामास वर्ष २०१८ मध्ये सुरुवात होईल. देवनार क्षेपणभूमीमध्ये जमा झालेल्या कच-यापासून वीजनिर्मिती करणा-या प्रकल्पाबाबत नियोजनात्मक कार्यवाही केली जाईल तसेच वस्त्रोद्योग संग्रहालय उभारण्याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात केली जाईल अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. 

सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शामलदास गांधी मार्गाच्या (Princes Street) उड्डाणपूलापासून वरळी - वांद्रे सागरी सेतू पर्यंतच्या ९.९८ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामास एप्रिल २०१८ मध्ये सुरुवात होईल. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मलजलावर प्रक्रिया करण्यासाठी वरळी, वांद्रे, धारावी, वर्सेावा, भांडूप, घाटकोपर येथे मलजल प्रक्रिया केंद्रे उभारले जाणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ऑगस्ट २०१८ मध्ये कार्यादेश निघतीलदहीसर परिसरातील भावदेवी मैदान आणि अंधेरी परिसरातील वीरादेसाई मार्ग या २ ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याची कार्यवाही नव्या वर्षात केली जाणार आहे. तसेच वरळी, गोवंडी, भांडूप, दहिसर याठिकाणी प्रत्येकी १ तर अंधेरी मध्ये २ नव्या तरण तलावांची निर्मिती केली जाणार आहे. 

गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्याचे रुंदीकरण व बांधकामाची कार्यवाही सुरु होईल. ही कार्यवाही तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. मुलुंडचे एम. टी. अगरवाल रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडीतील परिसरातील पंडीत मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय या रुग्णालयांच्या नवीन इमारतींच्या बांधकामास सुरुवात होईल. तसेच बा. य. ल. नायर धर्मार्थ रुग्णालय परिसरात १० मजली व ११ मजली इमारतींच्या बांधकामासोबतच आर. एम. ओ. निवासस्थानांची इमारत (RMO Quarter), तात्काळ वैद्यकीय सेवांसंबंधीची (EMS) इमातर इत्यादींबाबतची कार्यवाही सुरु होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर वांद्रे येथील भाभा रुग्णालय व शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयाच्या परिसरात देखील नवीन इमातर बांधण्याविषयी कार्यवाही येत्या वर्षी चालू होईल असे पालिकेने कळविले आहे. याव्यतिरिक्त 'राजीव गांधी सागरी सेतू' (वरळी वांद्रे सी लिंक) ते रंग शारदा मार्ग यांच्यात थेट संपर्क रस्ता तयार केला जाणार आहे. 'एच पश्चिम' व 'इ' विभागात भूमीगत वाहनतळ सुविधा तयार केले जाणार आहेत. 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom