२६ जानेवारीच्या ग्रामसभांमध्ये भुजबळांवरील अन्यायाच्या निषेधार्थ ठराव - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

21 January 2018

२६ जानेवारीच्या ग्रामसभांमध्ये भुजबळांवरील अन्यायाच्या निषेधार्थ ठराव


मुंबई । प्रतिनिधी - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच बहुजनांसह ओबीसी मागासवर्गीयांचे देशपातळीवरील नेते छगन भुजबळांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. सदर बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे भुजबळांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ ग्रामसभांमध्ये ठराव केले जाणार आहे.

शुक्रवार दि. २६ जानेवारी २०१८ रोजी राज्यभर सर्व गावांमध्ये ग्रामसभा होणार आहे. सदर ग्रामसभांचे औचित्य साधून छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ ग्रामसभांमधुन आवाज उठविण्यात येणार आहे. नाशिक येथे समर्थकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे ग्रामसभांमध्ये ठराव करण्याचे समर्थकांचे नियोजन आहे.

गेल्या २२ महिन्यांपासून कायद्याच्या आडून भुजबळांचा वृद्धापकाळात शारीरिक व मानसिक छळ होत आहे. सदर प्रकार हा मानवी मूल्यांना धरून नाही. भुजबळांसारख्या कर्तबगार नेत्याला कारागृहात डांबून ठेवल्यामुळे ग्रामस्थांचे अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे भुजबळांसोबतच ग्रामस्थांवर अन्याय होत असल्यामुळे सदर अन्यायाचा निषेध करून ग्रामस्थांच्या भावनांची दखल घेवून त्यांना जामीन मिळण्यासाठी ग्रामसभांमध्ये ठराव केले जाणार आहेत.

गटविकास अधिकाऱ्यांमार्फत हे ठराव शासनाला पाठवले जाणार आहेत. यासाठी भुजबळ समर्थक समन्वय समिती तसेच राज्यभरातील समर्थकांकडून प्रयत्न केले जाणार आहे. जास्तीत जास्त ग्रामसभांमध्ये ठराव करण्यासाठी समितीचे समन्वयक दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांनी आवाहन केले आहे.

Post Top Ad

test
test