Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मध्य रेल्वेवर फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटीची दंड वसुली


मुंबई । प्रतिनिधी - मध्य रेल्वेवर एप्रिल ते डिसेंबर 2017 यादरम्यान बिना तिकीट प्रवास करणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांविरोधात अभियान चालवण्यात आले. या अभियानादरम्यान तिकीटापेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणे, बिना तिकीट प्रवास करणे, बुकिंग न करता सामान घेऊन प्रवास करणे, अनधिकृत फेरीवाले अश्या विविध प्रकरणात कारवाई करून तब्बल 121.09 कोटी रुपयांच्या दंडाची वसूल करण्यात आली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी याच कालावधीत 20.5 टक्के जास्त दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवर एप्रिल ते डिसेंबर 2017 या कालावधीत तिकीटापेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणे, बिना तिकीट प्रवास करणे, बुकिंग न करता सामान घेऊन प्रवास करणे, अनधिकृत फेरीवाले अश्या विविध प्रकरणात कारवाईसाठी अभियान राबवण्यात आले. या अभियानादरम्यान 24.41 लाख प्रकरणात कारवाई करण्यात करून 121.09 कोटी रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. एप्रिल ते डिसेंबर 2016 या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 20.69 लाख प्रकरणे समोर आली होती. त्यावेळी मध्य रेल्वेने 100.53 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले होते. 2016 पेक्षा 2017 मध्ये कारवाईच्या प्रकरणात 17.94 टक्के तर दंड वसुलीमध्ये 20.46 टक्के इतकी वाढ झाली आहे. डिसेंबर 2017 या कालावधीत आरक्षित तिकीटांचा हस्तांतरणाची 439 प्रकरणे समोर आली असून त्यातून 3.56 लाख रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

डिसेंबर 2016 मध्ये तिकीटापेक्षा जास्त अंतराचा प्रवास करणे, बिना तिकीट प्रवास करणे, बुकिंग न करता सामान घेऊन प्रवास करण्याची 1.81 लाख प्रकरणे समोर आली आहेत. तर डिसेंबर 2017 मध्ये 2.06 लाख प्रकरणे समोर आली आहेत. डिसेंबर 2016 पेक्षा डिसेंबर 2017 मध्ये या प्रकरणात 14.01 टक्के इतकी वाढ झाली आहे. डिसेंबर 2017 मध्ये 8.76 कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. तर डिसेंबर 2016 मध्ये 7.68 कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला होता. डिसेंबर 2016 पेक्षा डिसेंबर 2017 मध्ये दंड वसुलीमध्ये 21.73 टक्के इतकी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेवर वेळोवेळी अश्या प्रकारच्या कारवाई करण्यात येते. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास केल्यास रेल्वेच्या महसुलात वाढ होऊन चांगल्या सुविधा देणे शक्य आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी केले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom